एक्स्प्लोर
काँग्रेसचे दिवगंत नेते मनोज म्हात्रेंच्या पत्नी अवघ्या 150 मतांनी विजयी
भिवंडी: भिवंडीतील काँग्रेसचे दिवंगत नेते मनोज म्हात्रे यांच्या पत्नी वैशाली म्हात्रे या 150 मतांनी विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 20 ब मधून त्या काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होत्या. अटीतटीच्या लढतीत वैशाली म्हात्रे यांनी बाजी मारली.
मनोज म्हात्रे यांच्या हत्येनंतर काँग्रेसनं त्यांच्या पत्नी वैशाली म्हात्रे यांना तिकीट दिलं. या निवडणुकीवेळी वैशाली म्हात्रे यांना चुरशीची लढत द्यावी लागली. या लढतीत त्या अवघ्या 150 मतांनी निवडून आल्या.
काँग्रेसचे दिवंगत नेते मनोज म्हात्रे
दरम्यान, भिवंडी-निजामपूर महापालिकेतील काँग्रेस नेते 14 फेब्रुवारीला मनोज म्हात्रेंची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी त्यांचा चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसचे ही हत्या प्रशांत म्हात्रेंनी राजकीय वैमनस्यापोटी घडवून आणल्याचा दावा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला होता.
मनोज म्हात्रे हे भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात राहत होते. काही कामानिमित्त ते त्यांच्या इमारतीखाली आले असताना दोघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. एकाने म्हात्रेंवर गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याने कोयत्याने वार केले होते.
संबंधित बातम्या:
भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी चुलतभावावर गुन्हा
भिवंडी पालिकेच्या सभागृह नेत्याची गोळ्या झाडून हत्या
भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज
भिवंडी पालिकेच्या सभागृह नेत्याची गोळ्या झाडून हत्या
भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बीड
विश्व
भारत
Advertisement