एक्स्प्लोर
भंगारासाठी देवनार डम्पिंगला आग लावल्याचा आरोप, 9 भंगार विक्रेत्यांना अटक
मुंबई: देवनार डम्पिंग आगीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 9 भंगार विक्रेत्यांना आज कुर्ला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी देवनार पोलिसांनी काल कारवाई केल्यानंतर आज या भंगारविक्रेत्यांना कोर्टात हजर करण्यात आलं.
भंगारातल्या लोखंडासाठी या विक्रेत्यांनी ही आग लावल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. यासाठी प्रसंगी भंगारविक्रेत्यांनी परिसरात राहणाऱ्या लहान मुलांचाही वापर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
अटक करण्यात आलेल्या या ९ भंगारविक्रेत्यांची दुकानं देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागूनचं आहेत, त्यातचं या विक्रेत्यांकडे कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसल्याचंही समजतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement