एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई विद्यापीठाचा 11 लाख पदव्यांचा तपशील पडताळणीसाठी ऑनलाईन उपलब्ध
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठात नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यासाठी एनएसडीएलसोबत मुंबई विद्यापीठाने करार केला आहे. यानुसार विद्यापीठाने 2013 पासून 2019 पर्यंत सहा वर्षातील 11 लाख विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती 'नॅड'च्या ऑनलाईन पोर्टलवर आहे
मुंबई : मुंबई विद्यापीठाने 'नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी' (नॅड) या केंद्र सरकारच्या डिजिटल पोर्टलवर गेल्या सहा वर्षांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तपशिल ऑनलाइन उपलब्ध करुन दिला आहे. नॅडच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर ही सेवा उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तपशील याद्वारे तात्काळ उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी होणार आहे. तसंच बोगस प्रमाणपत्र प्रकरणांना आळा बसणार आहे.
या सेवेसाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अनुदान आयोग यांनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) या संस्थेची नियुक्ती केली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठात नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यासाठी एनएसडीएलसोबत मुंबई विद्यापीठाने करार केला आहे. यानुसार विद्यापीठाने 2013 पासून 2019 पर्यंत सहा वर्षातील 11 लाख विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती 'नॅड'च्या ऑनलाईन पोर्टलवर आहे
या सुविधेचा उपयोग करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नॅडच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेत स्थळावर मुख्य पृष्ठावर स्क्रोलिंग मधले नॅड रजिस्ट्रेशन या सदराखाली एक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement