Bhiwandi Building Collapse: भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 10 जणांना जिवंत बाहेर काढलं
Bhiwandi Building Collapse: भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखालून 17 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
![Bhiwandi Building Collapse: भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 10 जणांना जिवंत बाहेर काढलं Death toll rises in Bhiwandi Building Collaps 8 people died and 10 people have been brought out alive Maharashtra marathi News Bhiwandi Building Collapse: भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 10 जणांना जिवंत बाहेर काढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/30/1a55714531fd48cb29472cbdd7822e451682818573172369_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhiwandi Building Collapse: भिवंडीतील (Bhiwandi) वळपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखील अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढलं आहे. सध्या NDRF कडून शेवटची चाचपणी सुरू आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारत मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रपाल पाटील असं ताब्यात घेतलेल्या इमारतीच्या मालकाचं नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली असून बहुतांश खोल्या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्यानं देण्यात आल्या होत्या.
दुर्घटनाग्रस्त इमारतीत तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचं गोडाऊन होतं, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या बनविण्यात आल्या होत्या. ज्यात भाडेतत्वावर नागरिक राहत होते. इमारतीवरील दोन मजले हे रहिवासी वापरासाठी होते. ज्यात 27 ते 30 खोल्या बनविण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे, या कमकुवत इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. ज्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता. इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकानं लक्षात घेतलेली नसल्यानं ही इमारत कोसळल्याचं बोललं जात आहे.
तब्बल 20 तास ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज...
भिवंडी तालुक्यातील वळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तीन मजली इमारत शुक्रवारी दुपारी एक वाजल्याच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यत 18 जणांना बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांनी यश आहे. तर या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनेक तास उलटूनही घटनास्थळी मदत आणि शोध कार्य सुरू असून गोदामात हमालीचे काम करणाऱ्या सुनील पिसाळ यांना काल (रविवारी) सकाळी दुर्घटनेनंतर वीस तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश आलं.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)