एक्स्प्लोर

Dapoli Sai Resort: साई रिसॉर्टच्या कारवाईबाबत सदानंद कदमांच्या याचिकेवर सोमय्या, इतर प्रतिवादींचा युक्तीवाद; आज सुनावणी

Dapoli Sai Resort: दापोलीतील साई रेसॉर्टच्या कारवाईबाबत आज हायकोर्टात सुनावणी. सदा कदम यांच्या याचिकेवर किरीट सोमय्या आणि इतर प्रतिवादी आज आपली भूमिका कोर्टात मांडणार.

Dapoli Sai Resort: दापोलीतील (Dapoli) बहुचर्चित 'साई रिसॉर्ट'च्या (Sai Resort) मालकाला तूर्तास दिलासा देत हायकोर्टानं या रिसॉर्टवर कारवाई करण्यापूर्वी रितसर नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी रिसॉर्ट मालकानं मुंबई उच्च न्यायालयात (High Court of Bombay) धाव घेतली आहे, राजकीय पुढाऱ्यांच्या वादात नाहक आपल्याला नोटीसा बजावल्या जात आहेत, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यावर गेल्या आठवड्यात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. ज्यात या प्रकरणातील मूळ तक्रारदार किरीट सोमय्या यांची हस्तक्षेप याचिका कोर्टानं स्वीकार करत त्यांनाही यात प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात चार आठवड्यांत प्रतिवाद्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत यावर आज, 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे.

रिसॉर्टवर कारवाईचे आदेश काय? 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान विभागानं (एमओइएफसीसी) दापोलीतील साई रिसॉर्ट्स एनएक्सच्या मालकांना कारणे दाखवा नोटीसी बजावली आहे. ज्यात या रिसॉर्टवर कारवाई का करू नये?, अशी विचारणाही केली आहे. इतकचं नव्हे तर पर्यावरणाचं नुकसान केल्याबद्दल 25 लाखांच दंडही आकरण्यात आला आहे. त्याच नोटीसीविरोधात या रिसॉर्टचे मालक सदानंद गंगाराम कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर हे वादग्रस्त आणि बेकायदेशीर रिसॉर्ट हे आधी राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचं असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे.

मात्र कदम यांना ही नोटीस बजावण्यापूर्वी त्यांची बाजू एकण्यात आलेली नाही. त्यांची बाजू मांडण्याची संधीच देण्यात आली नाही. त्यामुळे याप्रकरणी बजावण्यात आलेली नोटीस अवैध असून ती रद्द करावी असा युक्तिवाद कदम यांच्यावतीनं अँड. साकेत मोने यांनी गुरूवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर केला. 

याचिका काय आहे? 

सदानंद कदम यांनी याचिकेतून दावा केलाय की, साल 2017 मध्ये अनिल परब यांच्याकडून इथं बंगला बांधण्यासाठी आपण भूखंड खरेदी केला होता. सप्टेंबर 2017 मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांनी जमिनीचं बिगर-कृषी प्रयोजनात रूपांतर करण्यास त्यांना परवानगी दिली होती. त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये आमच्यात विक्री करार अंमलात आणला गेला. जमिनीच्या नावात बदल करण्यात आल्याच्या महसूल नोंदी असताना अनिल परब हे माजी मुख्यमंत्र्याचे निकटवर्ती असल्यामुळे तसेच या जागेचेही ते माजी मूळ मालक असल्यामुळे विरोधी राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली आज आपल्याला नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. असा दावा कदम यांनी याचिकेतून केला आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दापोलीतील विवादीत 'साई रिसॉर्ट' मालकाला तूर्तास दिलासा, कारवाईपूर्वी कदम यांना रितसर नोटीस पाठवण्याचे प्रशासनाला निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी
अभिनेता गोविंदा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी जबाबदारी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारीRashmi Barve : अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेला हा अन्याय आहे - रश्मी बर्वेAshok Chavan on Prakash Ambedkar  : मविआने प्रकाश आंबेडकरांना योग्य सन्मान दिला नाही - अशोक चव्हाणGovinda Speech Mumbai : ...म्हणून मी CM Eknath Shinde यांची शिवसेना निवडली, गोविंदाचं मराठीत भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी
अभिनेता गोविंदा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी जबाबदारी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Embed widget