एक्स्प्लोर

Dahi Handi 2024 : ठाणे, धारावीत 11 लाख, वरळीत भाजपाकडून 50 लाखांची बक्षिसं, मुंबईत कोणती दहीहंडी मानाची? जाणून घ्या सर्व काही

Dahi Handi 2024 : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दहीकाला उत्सव म्हणजे पर्वणीच. दहीहंडीपूर्वी अनेक दहीहंडी पथकं महिने दोन महिने अथक परिश्रम घेऊन मानवी मनोरे रचण्यासाठी प्रॅक्टिस करतायत.

Dahi Handi 2024 : येत्या 26 ऑगस्टला दहीहंडी (Dahi Hani 2024) उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दहीकाला उत्सव म्हणजे पर्वणीच. दहीहंडीपूर्वी अनेक दहीहंडी पथकं महिने दोन महिने अथक परिश्रम घेऊन मानवी मनोरे रचण्यासाठी प्रॅक्टिस करतायत. दहीहंडीला आता काही दिवस शिल्लक असताना बाळ गोपालांची तयारी कशी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पहिलाच उत्सव आहे तर हा उत्सव होणार की राजकीय शक्तीप्रदर्शन? हे जाणनू घेऊयात. 

गोंविदा रे गोपाळा...''अरे बोल बजरंग बली की जय...'असे सूर कानावर पडत राज्यात दहीहंडीचा उत्सव सुरू होतो. या सर्वात बाळ गोपाळ नित्यनेमाने गेल्या महिना दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करतायत.उंच उंच मनोरे लावण्यासाठी एकमेकांच्या साथीने तरुणाई अथक प्रयत्न घेत आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये फिरत असताना सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा मान मिळावा यासाठी बाळ गोपाळ प्रयत्नशील आहेत.

जन्माष्टमीचा पारंपरिक उत्सव की राजकारण्यांचा?

मात्र, सध्याच्या काळात हा सण जन्माष्टमीचा पारंपरिक उत्सव म्हणायचा की राजकारण्यांचा? असा प्रश्न पडावा इतके बदल कालांतराने दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात झालेले दिसतात. दरवर्षीप्रमाणे यंदाचा दहीकाला उत्सव जरा वेगळा असणार आहे. कारण काहीच महिन्यात आता विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे कोणाची दहीहंडी सर्वांत उंच? यासाठी संर्वात उंच थर लावण्यात कोण यशस्वी होणार? आणि लाखोंचं बक्षीस कोण देणार? यासाठीची राजकीय स्पर्धा ही सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई ठाणे आसपासच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी दहीहंडीपूर्वी दहीहंडी शिबिर राजकीय पक्षांकडून आयोजित केले गेलेत.

सर्वात मोठा दहीकाला उत्सव राजकीय पक्ष करण्याच्या प्रयत्नात असतात हे राज्यातील जनतेसाठी खरंतर चित्र तसं नवीन राहिलेलं नाही. परंतु, यंदाची दहीहंडी ही खऱ्या अर्थाने गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा की राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा? असा प्रश्न उपस्थित करणारी आहे. मात्र, असं असलं तरी बाळ गोपाळ हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या शहरातील धावपळीच्या आयुष्यातून काही वेळ काढत उंच थर लावण्यासाठी सध्या प्रॅक्टिस करून सज्ज झालेले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी देखील मोठ्या दहीहंड्यांचं आयोजन केलं आहे.

मुंबई, ठाण्यात दहीहंडीच्या उत्सवाला राजकीय आखाड्याचं स्वरुप

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दहीहंडीच्या उत्सवाला राजकीय आखाड्याचं स्वरुप आलेलं दिसतं. कोणता नेता आपल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात किती लाखांचं बक्षीस देणार याचीच स्पर्धा रंगल्याचं चित्र यावर्षी दिसत आहे. गेल्या काही वर्षांत या उत्सवाचं रुपांतर भव्य इव्हेंटमध्ये झालं हे उघड आहे. हंडी फोडण्याच्या स्पर्धेत नंतर याला साहसी खेळ म्हणून मान्यताही देण्यात आल्यानंतर गेल्या वर्षापासून प्रो गोविंदाचा देखील थरार हा मुंबईत पाहायला मिळतो. यावर्षी या साहसी खेळात जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने बाजी मारलीय. त्यामुळे शहरात लागणाऱ्या राजकीय दहीहंडी देखील फोडण्यासाठी हे बाळ गोपाळ प्रयत्नशील आहेत.

राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना त्यात निवडणुका तोंडावर आहेत. अशात राजकीय नेत्यांनी दहीहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे. कुठे लाईव्ह म्युजिक तर कुठे डिजे. तर कुठे सिनेक्षेत्रातील लोक या दहीकाला उत्सवाची शोभा वाढवणार आहेत.

राजकीय मंडळींचा दहीकाळा उत्सव आणि आकर्षण यंदा कसं आहे?

  • ठाण्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या 'संस्कृती प्रतिष्ठान' आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. 
  • धारावीत 11 लाख 111 रुपयांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. 
  • वरळी भाजपची परिवर्तन दहीहंडी यात 50 लाखापेक्षा अधिक बक्षीसं आहेत. 
  • दादर शिवसेना उद्धव ठाकरे भाजप यांच्या वतीने दादर परिसरामध्ये दहीहंडी उभारण्यात येणार आहे, यातही लाखोंची बक्षीस आहेत.
  • माटुंगा परिसरात शिवसेना दोन्ही गटांकडून लाखो रुपयांच्या दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. 
  • घाटकोपर येथे आमदार राम कदम हे भारतातली सर्वात मोठी दहीहंडी उभारणार आहेत असा त्यांचा दावा आहे. 
  • विक्रोळी मनसे आणि शिवसेना यांच्या वतीने देखील लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या दहीहंडी उभारण्यात येणार आहेत.  
  • ठाणे येथे सरनाईक यांच्या दहीहंडीप्रमाणेच मनसे अविनाश जाधव, शिवसेना नरेश मस्के नेत्यांमार्फत ठाण्यात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.  
  • अंधेरी परिसरात भाजपकडून आणि शिवसेनेकडून दहीहंडी उभारली जाणार आहे यामध्ये देखील लाखो रुपयांची बक्षीसं आहेत. 
  • बोरिवली माघाटणे प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी, लाखो रुपयांची बक्षीस आणि विविध सेलिब्रिटींची एन्ट्री यामध्ये पाहायला मिळणार आहे. 
  • या सर्व दही काळा उत्सवामध्ये सेलिब्रिटी, राजकीय मंडळी कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत.
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे देखील स्वतः अनेक दहीहंडी आयोजनाच्या इथे बाळ गोपाळांचा उत्साह वाढवण्यासाठी जाणार आहेत. 

गोविंदाच्या विम्यासाठी राज्य सरकारकडून लाखो रुपयांची मंजुरी

गेल्या महिना दोन महिन्यापासून बाळ गोपाळ उंच उंच थर लावून विक्रम करण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारने गोविंदाच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजार रुपयांची रक्कम सरकारने मंजूर केली आहे.त्यामुळे यंदा गोविंदा ही बिनधास्तपणे सर्वत्र मनोरे रचण्यासाठी सज्ज तर राजकीय पक्ष ही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून मतदारांना साद घालण्यासाठी तयारीत आहेत. 

हे ही वाचा :

Dahi Handi 2024 : यंदा दहीहंडीच्या दिवशी जोरदार पावसाचा इशारा, मुंबईत गोविंदांच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना; दहीहंडी पथकांसाठी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्टची व्यवस्था

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget