एक्स्प्लोर

Dahi Handi 2024 : यंदा दहीहंडीच्या दिवशी जोरदार पावसाचा इशारा, मुंबईत गोविंदांच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना; दहीहंडी पथकांसाठी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्टची व्यवस्था

Dahi Handi 2024 : दहीहंडीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तरीही गोविंदांचा उत्साह मात्र कमी होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Dahi Handi 2024 : दहीहंडी उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच मुंबईत दहीहंडी (Dahi Handi 2024) सराव शिबिरांचं आयोजन मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल (24 ऑगस्ट) सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडत असला तरी गोविंदांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. यंदा दहीहंडीला जोरदार पावसाचा इशारा दिला असानाच आता गोविंदांच्या सुरक्षेसाठी पालकमंत्री पुढे सरसावले आहेत. गोविंदा सराव पथकांना मुंबई महापालिकेने क्रेन, दोरी आणि सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकरांनी दिले.

'दहिहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत?'

गोविंदा सराव पथकांना मुंबई महापालिकेने क्रेन आणि दोरी आणि सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करीत असते, तर दहिहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे? अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

दहीहंडीच्या दिवशीही पुरवली जाणार विशेष सुरक्षा

गोविंदा, दहिहंडी आणि उंच मानवी थर ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो गोविंदांसाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला. मात्र मुंबईत विविध ठिकाणी जी गोविंदा पथकं सराव करत असतात त्यांना मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्ट पुरवावे, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. तसेच मंगळवारी गोपाळकालाच्या दिवशी देखील ही सेवा पुरवावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.

पुढील वर्षी क्रेनची संख्या आणखी वाढवणार

वरच्या दोन-तीन थरांवर असलेल्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या, दुर्घटना घडून कोणती जिवितहानी होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून हा खर्च करावा, असेही आदेश केसरकरांनी दिले आहेत. असं पाऊल उचलण्यात येत असलेलं हे पहिलंच वर्ष असून किती आणि कशाप्रकारे क्रेन पुरवता येतील त्याचा विचार करावा आणि पुढील वर्षी जास्तीतजास्त मंडळांना क्रेन पुरवाव्या, असंही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालिका प्रशासनाला सांगितलं आहे.

सरावादरम्यान सेलिब्रिटींची उपस्थिती

मुसळधार पाऊस असताना देखील गोविंदांनी थरावर थर रचण्याचा विक्रम केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट दिंडोशी विधानसभा प्रमुख वैभव भराडकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी सराव शिबिराला अभिनेते प्रसाद ओक (Prasad Oak), निर्माते प्रवीण तरडे सोबत खासदार रवींद्र वायकर,खासदार नरेश मस्के यांनी देखील हजेरी लावली होती. कुरार येथे आयोजित करण्यात आलेल्या या सराव शिबिराला मुंबईतील शंभर पेक्षा अधिक गोविंदा पथकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुसळधार पाऊस असताना देखील गोविंदांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

घाटकोपरमध्ये तमन्ना भाटिया, स्वप्निल जोशीची उपस्थिती

घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेच्या वतीने चोर हंडी म्हणजेच दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या वतीने या भव्य दिव्य चोर हंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या हंडीला प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता स्वप्नील जोशी उपस्थित होते. या वेळी दोन्ही कलाकारांनी दहीहंडी उत्सवाचं कौतुक केलं.आपल्याला हा उत्सव लहानपणापासूनच आवडत असून यात लहान लहान मुलींचा सहभाग बघून आनंद होत असल्याचं तमन्ना भाटियाने सांगितलं. तर हा उत्साह आनंद पाहून उर भरून येत असल्याचं स्वप्नील जोशी म्हणाला.

'घाटकोपर विधानसभेची हंडी मनसेच फोडणार'

मुंबईला उत्सवाची परंपरा आहे, स्थानिक गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी या दहीहंडीचं आयोजन केलं असून यंदाच्या वर्षी घाटकोपरच्या विधानसभेची हंडी मनसेच फोडणार असल्याचं मनसे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल म्हणाले.

हेही वाचा:

Dahi Handi 2024 : 26 की 27 ऑगस्ट? कधी साजरी होणार दहीहंडी? जाणून घ्या अचूक तारीख आणि महत्त्व

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget