एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cruise Drugs Party : जेल की बेल? आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Cruise Drugs Party : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

Cruise Drugs Party : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ला जामीन मिळणार की, कारागृहातील त्याचा मुक्काम वाढणार याचा फैसला आज होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांची आज एनसीबी कोठडी संपत असून यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खानची एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर सोमवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयानं 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावणीत आली होती. ही कोठडी आज संपत असून आज आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली जाणार आहे. 

क्रूझवरील पार्टीसाठी परवानगी दिलीच कुणी? ड्रग पार्टी प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री

शाहरुखचा मुलगा आर्यन खान ज्या ड्रग्ज पार्टीमुळे कोठडीत आहे, त्यात आता मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली आहे. कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, या पार्टीसाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पाच पेक्षा जास्त लोक याठिकाणी जमलेच कसे, याचा तपासही आता मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसही याप्रकरणात कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या मुंबई पोलिसांनी विविध यंत्रणांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एनसीबी विरुद्ध मुंबई पोलीस असा संघर्ष पाहायला मिळत आहे. 

दुसरीकडे एनसीबी मुंबई पथकाच्या मदतीला देशभरातली पथकं धावून आल्याचं कळतंय. कारण सकाळपासून गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्ली एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळं एनसीबीचं पुढचं ऑपरेशन काय असणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या क्रूझवर छापा मारत दहाहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, काही जणांची रात्रीत चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या 8 ते 10 जणांपैकी एक जण बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्याचा मुलगा देखील असल्याची माहिती आहे. यात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जरी असलं तरी आज कुणालाही कोर्टात हजर केलं जाणार नसल्याचं एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. सोबतच कोणालाही अटक केली नसून तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीत काय माहिती पुढे येते आणि बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाते का? हे पाहाणं महत्त्वाचे असणार आहे. सोबतच आणखी एका अभिनेत्याची मुलगी देखील यात असल्याची माहिती देखील समोर आली आहे. 

ड्रग्जसाठी बिटकॉईन, डार्कनेटचा वापर

शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ज्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी कोठडीची हवा खावी लागतेय. त्या प्रकरणाची व्यापी फक्त दिल्ली-मुंबईपुरती मर्यादीत नाही, तर याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. क्रूझवर पार्टीसाठी जे ड्रग्ज आणण्यात आलं होतं, त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला होता.  क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं आर्यन खानसह एकूण 8 जणांना अटक केली आहे. यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर, एनसीबीनं एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतलंय. या तस्कराच्या चौकशीनंतर ड्रग्जसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर झाल्याची माहिती मिळाली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठकBawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णयYogesh Kadam Full Interview : मुख्यमंत्रि‍पदासाठी शिंदे युती तोडणार नाहीत, ते उद्धव ठाकरे नाहीत..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Embed widget