Mumbai Corona Update : शुक्रवारी मुंबईत 1,297 जणांची कोरोनावर मात, 846 नव्या रुग्णांची नोंद
Mumbai Corona Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

Mumbai Corona Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेटही वाढत आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबईत 1,297 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 846 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत मुंबईमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे.
दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या पाहाता मुंबईतील तिसरी लाट आटोक्यात आल्याचे चित्र आहे. तिसऱ्या लाटेत मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या 25 हजारांच्या आसपास गेली होती. आता हीच रुग्णसंख्या आठशे ते नऊशेच्या आतमध्ये आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी मुंबईत 846 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1,297 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1,023,589 इतकी झाली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 97 टक्केंवर पोहचला आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) February 4, 2022
New Cases - 13,840
Recoveries - 27,891
Deaths - 81
Active Cases - 1,58,151
Total Cases till date - 77,82,640
Total Recoveries till date - 74,91,759
Total Deaths till date - 1,42,940
Tests till date - 7,52,54,877
सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 7,135 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 662दिवसांवर आला आहे. मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.10% टक्के इतका झालाय. मुंबईत मागील 24 तासांत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्या मुंबईतील 3 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 846 रुग्णांपैकी 111रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 211 बेड्सपैकी केवळ 1 हजार 37,211बेड वापरात आहेत.
संबधित बातम्या :
Black Box : मुंबई लोकलमध्ये ब्लॅक बॉक्स बसवणार, अपघातावेळचा तपशील जतन होणार
सर्व्हे मंकीचा दाखला देत वाहतूक कोंडी संदर्भातील वक्तव्यावर अमृता फडणवीसांचे स्पष्टीकरण
Best State Tableau : महाराष्ट्राचा चित्ररथ लोकप्रिय निवड श्रेणीत पहिला तर उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


















