एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Best State Tableau : महाराष्ट्राचा चित्ररथ लोकप्रिय निवड श्रेणीत पहिला तर उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट

महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय विभागातून बक्षीस,  ऑनलाईन मतदानात सर्वाधिक लोकांनी महाराष्ट्राला दिलेली पसंती 

UP Best State Tableau :  प्रजासत्ताक दिन संचलन 2022 मधील सर्वोत्कृष्ट चित्ररथ आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी यासाठीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट चित्ररथ ठरला आहे. तर महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय विभागातून बक्षीस मिळालं आहे.  ऑनलाईन मतदानात सर्वाधिक लोकांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. 

तीन सुरक्षा सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/इतर सहाय्यक दल आणि विविध विभागातील दल, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/विभाग यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीशांच्या तीन समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने शुक्रवारी सर्वोत्कृष्ट चित्ररथ आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी यासाठीचे निकाल घोषित केले आहेत. समितींच्या मूल्यांकनाच्या आधारे, भारतीय नौदलाच्या संचलन तुकडीला तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्कृष्ट संचलन दल म्हणून निवडण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट -
26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामधे सहभागी झालेल्या 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची सर्वोत्कृष्ट म्हणून निवडल झाली. उत्तर प्रदेशचा चित्ररथ 'एक जिल्हा एक उत्पादन आणि काशी विश्वनाथ धाम' या संकल्पवेवर आधारित होता. दुसरे स्थान कर्नाटकच्या ‘पारंपारिक हस्तकले’ वर आधारित चित्ररथाला मिळाले. तिसरे स्थान ‘मेघालयच्या राज्याची 50 वर्षे आणि महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आणि बचगट यांना मानवंदना’ या विषयावरील चित्ररथासाठी मेघालयला मिळाले.

Best State Tableau : महाराष्ट्राचा चित्ररथ लोकप्रिय निवड श्रेणीत पहिला तर उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट

लोकप्रिय निवड पुरस्कार -
पहिल्यांदाच, मायजीओव्ही (MyGov) व्यासपीठाद्वारे, लोकप्रिय निवड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट संचलन दल आणि सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी मतदान घेतलं होतं. मतदानासाठी सर्वसामान्यांना आमंत्रित करण्यात आले होते.  25-31 जानेवारी 2022 दरम्यान ऑनलाइन मतदान घेण्यात आले. लोकप्रिय निवडीनुसार, भारतीय हवाई दलाची संचलन तुकडी तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून निवडली गेली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्तम संचलन दल म्हणून मायजीओव्हीवर (MyGov) सर्वाधिक मते मिळाली. लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची सर्वोत्तम म्हणून निवड झाली.  महाराष्ट्राचा चित्ररथ ‘महाराष्ट्रातील जैवविविधता आणि राज्य जैव-मानके’ या संकल्पनेवर आधारित होता. उत्तर प्रदेशाला (लोकप्रिय पसंती) द्वितीय क्रमांक मिळाला, तर ‘जम्मू आणि काश्मीरचा बदलणारा चेहरा मोहरा’ या विषयावरील जम्मू आणि काश्मीरच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला.

संयुक्त विजेते -
केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या श्रेणीमध्ये शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आला आहे.  शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या चित्ररथाची संकल्पना ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ होती, तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ ‘उडे देश का आम नागरिक’ या संकल्पनेवर आधारित होता.  संचलनामध्ये केंद्रीय मंत्रालये/विभागांचे नऊ चित्ररथ सहभागी झाले होते. 'सुभाष @125' या संकल्पनेवर आधारित गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (सीपीडब्लूडी) आणि 'वंदे भारतम' नृत्य गटाची विशेष पारितोषिक श्रेणीसाठी निवड करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :27  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut PC | पाशवी बहुमत देशाला, राज्याला हानीकारक; युज अँड थ्रो हे भाजपचं धोरण- संजय राऊतRajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार? VIDEO
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Embed widget