एक्स्प्लोर
Aamir Khan Deepfake: आमिर खान बनावट व्हिडिओ प्रकरण, पुरावे न मिळाल्याने केस बंद
अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) बनावट व्हिडिओ प्रकरणात (Fake Video Case) मोठी अपडेट समोर आली आहे. खार पोलिसांनी (Khar Police) हा तपास आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'गुन्हा घडलाय पण संबंधितांविरोधात पुरावे न आढळल्यामुळे पोलिसांनी केस बंद करण्याचा निर्णय घेतलाय', असं म्हणत पोलिसांनी कोर्टात 'ए समरी' रिपोर्ट सादर केला आहे. काही काळापूर्वी आमिर खानचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो काँग्रेस (Congress) पक्षासाठी प्रचार करत असल्याचे दिसत होते. यानंतर आमिर खानच्या टीमकडून खार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता, मात्र आता पुराव्यांअभावी ही केस बंद करण्यात येत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















