Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा! 367 नवे कोरोनाबाधित, 841 जण कोरोनामुक्त
मुंबईमध्ये आज 367 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सद्या एकही इमारत किंवा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) नसल्याने पालिकेसह मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Mumbai Corona Update : मुंबईत आज 367 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या आणखी कमी असल्याने मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. गुरुवारी मुंबईत 429 रुग्ण आढळले होते. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत 367 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर जण 841 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 3 हजार 219 इतकी झाली आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी हजार पार
मुंबईकरांना आणखी दिलासा मिळाला आहे, कारण कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा आज एक हजारांपार गेला आहे. आज हा कालावधी 1 हजार 55 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये तब्बल 106 दिवसांची वाढ झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.07% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. आज नव्याने सापडलेल्या 367 रुग्णांपैकी 50 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 966 बेड्सपैकी केवळ 1 हजार 162 बेड वापरात आहेत.
राज्यात 5 हजार 455 नवे कोरोनाबाधित
मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्याही कमी होत आहे. राज्यात आज नवे 5 हजार 455 कोरोनारुग्ण आढळले आहेत. गुरुवारच्य़ा तुलनेत ही रुग्णसंख्या 793 ने कमी झाली असून 63 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 14 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3531 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2353 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,178 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
काळजी घेणं गरजेचं
जागतिक आरोग्य संस्थेने कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं असून ओमायक्रॉननंतर देखील नवा व्हेरियंट येऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. कोव्हिड 19 तांत्रिक दलाच्या की मारिया वान केरखोव यांनी सावध इशारा देताना, 'आम्ही या विषाणूबद्दल बऱ्याच गोष्टी जाणतो. पण यात अनेक बदल होत असल्याने आम्ही यावर नजर ठेवून आहोत. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.'
संबंधित बातम्या :
- Maharashtra Omicron Cases: राज्यात आज ओमायक्रॉनच्या 76 रुग्णांची नोंद, पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक झाल्याचा दावा
- mRNA vaccine : पुण्यात तयार झाली भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha