Maharashtra Corona Update : राज्यात रुग्णसंख्या उतरणीला, शुक्रवारी 5455 रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाच्या 5 हजार 455 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 14 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 5 हजार 455 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या 793 ने कमी झाली असून 63 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 14 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3531 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2353 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,178 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज 63 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 63 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 14 हजार 635 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के आहे. सध्या राज्यात 6 लाख 10 हजार 718 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2392 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 657 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर आज 13.4 टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या दिवसापेक्षा आज कोरोना रुग्णांची संख्या कमी नोंदवली आहे. हळूहळू रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होत आहे. काल देशात 67 हजार 84 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 1 हजार 241 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामानाने आज रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, मृत्यूच्या संख्येत देखील घट झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: