कोविड -19 लसीकरणाच्या शीतगृहाचे काम जानेवारी 2021 अखेर पूर्ण होणार : महापौर किशोरी पेडणेकर
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे कांजुरमार्ग ( पूर्व) येथे निश्चित करण्यात येणाऱ्या शीतगृहाच्या जागेची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी करून तयारी कामांचा आढावा घेतला.
मुंबई : कोविड-19 संभाव्य लसीकरणाच्या साठ्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे कांजुरमार्ग ( पूर्व) येथे निश्चित करण्यात आलेल्या शीतगृहाचे काम जानेवारी 2021 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे कांजुरमार्ग ( पूर्व) येथे निश्चित करण्यात येणाऱ्या शीतगृहाच्या जागेची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी करून तयारी कामांचा आढावा घेतला. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "कोरोना- 19 या लसीच्या साठवणुकीसाठी कांजुरमार्ग परिवार संकुलात एक अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी संकुलातील पाच माळांपैकी तीन माळे हे शितगृह केंद्रासाठी महानगरपालिकेतर्फे निश्चित करण्यात आले आहेत" .
बाहेरील वातावरणाचा लसींवर कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये, यासाठी सदर जागेवर +2 डिग्री सेल्सियस ते +8 डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले 40 क्युबिक मीटरचे दोन उपकरणे (walk in cooler)बसविण्यात येणार आहे. त्यासोबतच - 15 डिग्री सेल्सिअस ते - 25 डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले 20 क्युबिक मीटरचे (walk in freezer) बसविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
सदर शीतगृहात मुंबईला आवश्यक असलेला कोविड -19 या लसीचा पुरेसा साठा ठेवण्याची क्षमता असल्याचे महापौरांनी यावेळी प्रतिपादन केले. सदर शीतगृहे हे सकाळी सौरऊर्जेवर व रात्री थेट वीजपुरवठावर चालविण्यात येणार असल्याने विजेची बचत होऊन पर्यावरणाला हातभार लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास यासाठी प्रत्येक युनिट निहाय स्वतंत्र डीजे सेटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाल्या.
संबंधित बातम्या :