COVAXIN | कोवॅक्सिन लस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण का झाली? भारत बायोटेकचं स्पष्टीकरण...
कोवॅक्सिन लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असते. त्यानंतर शरीरात अँटिबॉडीज् तयार होत असतात.
![COVAXIN | कोवॅक्सिन लस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण का झाली? भारत बायोटेकचं स्पष्टीकरण... Why did Anil Vij get corona despite taking covaxin vaccine? Explanation of Bharat Biotech COVAXIN | कोवॅक्सिन लस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण का झाली? भारत बायोटेकचं स्पष्टीकरण...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/30165350/covaxin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंढिगड : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून डोस घेतला होता. मात्र तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
भारत बायोटेकने याबाबत ट्वीट करत माहिती दिली की, कोवॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल दोन डोसवर आधारित आहे. त्यासाठी 28 दिवसांचा कालावधी आहे. लसीचा परिणाम दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी निश्चित होणार आहे. कोवॅक्सिन लस दोन डोस दिल्यानंतर प्रभावी ठरते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 50 टक्के स्वयंसेवकांना कोवॅक्सिन लस तर इतरांना प्लेसबो (डमी लस) देण्यात आला होता.
COVAXINᵀᴹ trials are based on a 2-dose schedule, given 28 days apart. The vaccine efficacy will be determined 2 weeks after the 2nd dose. pic.twitter.com/ZKmGuKbBMf
— BharatBiotech (@BharatBiotech) December 5, 2020
चाचणीमध्ये निम्म्या स्वयंसेवकांना लस आणि निम्म्या स्वयंसेवकांना प्लेसबो देण्यात आला. मात्र स्वयंसेवकांना याबाबत माहिती दिली जात नाही. तसेच लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असते. त्यानंतर शरीरात अँटिबॉडीज् तयार होत असतात.
अनिल विज यांनी मागील महिन्यात 20 नोव्हेंबर रोजी यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी पहिला डोस घेतला होता. 20 नोव्हेंबर रोजी हरियाणामध्ये कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली होती. यावेळी अनिल विज यांनी पहिला डोस देण्यात आला होता. विज यांच्यासोबत 200 स्वयंसेवकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला होता. यानंतर 28 दिवसांनी त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. परंतु दुसरा डोस घेण्याच्या आधीच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)