(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona in Mumbai : मुंबईकरांनो काळजी घ्या!, कोरोना वाढीचा दर वाढतोय
Corona in Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी शासन सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. पण नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने (Corona Virus) सर्व जगाची चिंता वाढवली आहे. भारतात देखील कोरोनाने हाहाकार माजवला असून देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्येही कोरोनाने (Mumbai Corona) बरंच नुकसान केलं. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून मागील काही महिन्यांत लसीकरणाचा वाढलेला वेग (Vaccination Rate) आणि शासनाच्या विविध उपाययोजनांनी कोरोना आटोक्यात येत आहे असे वाटत होते. पण तितक्यात ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटच्या एन्ट्रीनंतर पुन्हा एकदा काळजी वाढली आहे. त्यात मुंबईचा विचार करता मागील काही दिवसांत कोरोना रुग्णवाढीचा दर वाढल्याने पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे.
आकडेवारीचा विचार करता 9 डिसेंबर रोजीपर्यंत रुग्ण वाढीचा दर 0.02 टक्के इतका होता. पण त्यानंतर 10 डिसेंबरपासून मात्र हा दर 0.03 टक्के झाला आहे. दरम्यान या वाढलेल्या रुग्णवाढीच्या दरामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा दर जो 9 डिसेंबर रोजी 2 हजार 613 इतका होता. जो कमी होत चालला आहे. 12 डिसेंबर रोजी हा दर 2 हजार 528 इतका झाल्याने कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय होऊ लागला आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलीच आहे. पण मुंबईकरांना अधिक काळजी घेण्याची गरजही निर्माण झाली आहे. महापालिकेतर्फे दररोज समोर येणारे कोरोना रुग्ण आणि वाढीचा दर अशा साऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यानेच समोर आलेल्या या माहितीनुसार मुंबईकरांनी काळजी घेणे आता अनिवार्य झाले आहे.
मागील काही दिवसांतील कोरोना वाढीचा दर-
रविवारी मुंबईत समोर आलेली रुग्णसंख्या
रविवारी (12 डिसेंबर) मुंबईत 187 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या एक हजार 774 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर गेलंय. मुंबईत आतापर्यंत ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळले आहेत.
संबंधित बातम्या
- Omicron Cases : देशातील ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 37, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
- लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मुंबई लोकलनं प्रवासाची मुभा देण्यावर ठाम आहात का? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
- Vaccine | लस खरेदीची आतापर्यंतची आकडेवारी सर्व तपशिलांसह सादर करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live