एक्स्प्लोर

Corona Vaccination : घरोघरी नाही मात्र, घराजवळ नक्कीच लसीकरण शक्य; मुंबई उच्च न्यायालयात केंद्राकडून प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण

केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 28 मेपर्यंत झालेल्या लसीकरणातून 25 हजार 309 नागरिकांना साईड इफेक्ट जाणवले असून त्यात 1183 प्रकरण गंभीर स्वरुपाची आहेत. तर 475 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करता येणार नाही. मात्र, घराजवळ त्यांचं लसीकरण होणं नक्कीच शक्य आहे, असे स्पष्टीकरण मंगळवारी केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान दिलं.

केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 28 मेपर्यंत झालेल्या लसीकरणातून 25 हजार 309 नागरिकांना साईड इफेक्ट जाणवले असून त्यात 1183 प्रकरण गंभीर स्वरुपाची आहेत. तर 475 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे. भारतात सुमारे 25 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं आहे. इतकी मोठी लोकसंख्या असलेला देश असूनही आपण सक्षमरित्या लसीकरण मोहिम राबवित आहोत, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी बाहेर जाणं शक्य नसल्यामुळे त्यांना घरोघरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयातील वकील ध्रुती कापाडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तूर्तास घरोघरी जाऊन लसीकरणाचं धोरण अवलंबणं हे व्यवहार्य होणार नाही. असं केंद्र सरकारच्यावतीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एनईजीव्हीएसी) नं म्हटलं आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना घरोघरी न जाता घराजवळ लसीकरण मोहिम राबविणे जास्त सयुक्तिक ठरेल असे स्पष्ट केले आहे. तसेच वयोवृद्ध, दिव्यांगांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा असल्यामुळे आवश्यक त्या सर्व उपाययोजना, दक्षता आणि सुरक्षिततेची सोय करूनच त्यांच्याजवळ लसीकरण केंद्र उभारण्याची आवश्यकता असल्याचेही  एनईजीव्हीएसीने म्हटलं आहे.

मात्र घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत तज्ज्ञ समितीने उपस्थित केलेले मुद्दे हे फारसे गंभीर दिसत नाहीत. राज्य सरकारची इच्छा असल्यास त्यावर नक्कीच तोडगा निघू शकतो. कारण घरोघरी लसीकरण करताना निर्माण होणाऱ्या समस्या या लसीकरण केंद्रावर जाऊनही भेडसावू शकतात. असं स्पष्ट करत हायकोर्टानं वेळेअभावी सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आमच्या बोलण्यानं जर कुणी दुखावलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, न्यायमूर्तींनी भर कोर्टात केली दिलगिरी व्यक्त

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Mahamandal Vatap: मोठी बातमी: राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?
राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?
Watermelon Death Case Mumbai Family News: कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?
कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले, नेमकं काय समोर आलं?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
मोठी बातमी! OBC क्रिमीलेअर मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याची शिफारस, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव
मोठी बातमी! OBC क्रिमीलेअर मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याची शिफारस, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Vladimir Putin Meet Xi Jinping:ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
Embed widget