मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी; पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांच्या सुविधा उपलब्ध
मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची सेवा उपलब्ध झाली आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना जास्तीत जास्त 4500 रुपये एवढे शुल्क एका चाचणीसाठी आकारता येणार आहे.
मुंबई : 'कोरोना कोविड 19' या विषाणूजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर नागरिकांना अधिकाधिक वैद्यकीय सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी महापालिका विविध स्तरावर देखील संवाद व समन्वय नियमितपणे साधत आहे. महापालिकेच्या याच प्रयत्नांमुळे आजपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची सेवा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे नागरिक या प्रयोगशाळांशी संपर्क साधून व तेथील तज्ज्ञांना आपल्या घरी बोलावून चाचणी करवून घेऊ शकणार आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना जास्तीत जास्त 4500 रुपये एवढे शुल्क एका चाचणीसाठी आकारता येणार आहे.
कोरोना व्हायरसची चाचणी उपलब्ध असलेल्या पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची नावे व संपर्क क्रमांक
सबर्बन डायग्नोस्टिक्स : 022-6170-0019थायरोकेअर : 9702-466-333
मेट्रोपोलीस : 8422-801-801
सर एच एन रिलायन्स : 9820-043-966
एसआरएल लॅब
India Lockdown : आज रात्री 12 पासून संपूर्ण देश पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी
कोरोनाची चाचणी करण्यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांचे चाचणीसाठीचे शिफारसपत्र (Prescription) असणे आवश्यक आहे. हे पत्र नागरिकांना त्यांच्या जवळच्या डॉक्टरांकडून घेता येईल. ज्या व्यक्तींना दमा, श्वसनाचे आजार, निमोनिया, ताप, थंडी, खोकला यासारख्या बाबी आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही चाचणी करवून घेण्यास हरकत नाही.
दोन दिवसात 'क्वारंटाईन' करण्यात आलेल्या सुमारे 1200 संशयित रुग्णांशी महापालिकेच्या 40 डॉक्टरांनी दिवसभरात संवाद साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली. या दूरध्वनी संवादादरम्यान ज्या रुग्णांमध्ये लक्षणे जाणवून आली, अशा 7 संशयित व्यक्तींना खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून तातडीने कोरोना चाचणी करवून घेण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. महापालिकेचे डॉक्टर या सर्व व्यक्तींच्या नियमितपणे संपर्कात आहेत.
संबंधित बातम्या