एक्स्प्लोर

कोरोनाच्या विळख्यात आलेल्या बाळंतिणीला व्हाईट आर्मीमुळे जीवदान, 13 दिवसांचे बाळही सुखरूप

सासरच्या आणि माहेरच्या मंडळीने व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे आणि त्यांच्या सर्व मेहनती जवानांचे तसेच मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर आणि विशेष करून तिच्यावर उपचार करणारे डॉ.आबाजी शिर्के यांचे मनापासून आभार व्यक्त केलेत.

मुंबई : बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ओल्या बाळंतिणीला कोल्हापूरच्या व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटरमुळे जीवदान मिळाले.16 सप्टेंबर रोजी ही बाळंतीण आपल्या 13 दिवसांच्या नवजात कन्येसह आपल्या आईच्या घरी जातेय. कोरोनाला हरवून घरी परतणाऱ्या या आपल्या मुलीला जीवदान मिळाल्याने घरची मंडळी आनंदून गेलीयत. सासरच्या आणि माहेरच्या मंडळीने व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे आणि त्यांच्या सर्व मेहनती जवानांचे तसेच मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर आणि विशेष करून तिच्यावर उपचार करणारे डॉ.आबाजी शिर्के यांचे मनापासून आभार व्यक्त केलेत.

प्रयाग चिखली येथील मुलीला लग्न लावून मुंबईला दिली. संसार सुखाचा सुरू झाला.गरोदरपणात बाळंतपणासाठी तिला माहेरी यायचे होते. ती तीन महिन्यांपूर्वी प्रयाग चिखलीमध्ये माहेरला आली. एका नामांकित प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरकडे तिच्यावर गरोदरपणात उपचार सुरू होते.दिवस भरले आणि तीन सप्टेंबर रोजी तिच्या पोटात दुखू लागले. म्हणून दवाखान्यात नेले.पण स्वॅब घेतल्याशिवाय तिला दाखल करून घेण्यासाठी डॉक्टर तयार झाले नाहीत. अशातच तिचा स्वॅब दिला.आणि तो पॉझिटिव्ह आला. हे ऐकून 'त्या'डॉक्टर ने या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घ्यायला नकार दिला. घरच्या लोकांची तारांबळ उडाली. पण जवळच्याच एका डॉक्टरांनी तिला आपल्या पेशाला शोभेल असे निर्णय घेऊन तिला आपल्या दवाखान्यात दाखल करून घेतले. प्रसव वेदना असह्य झाल्या,पण डॉक्टरांनी सिझेरियन करून बाळाचा आणि मातेचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास या मातेने एका गोंडस कन्या रत्नाला जन्म दिला. या मातेचे नाव अमृता सचिन गुरव वय (28 वर्षे ) सध्या राहायला मुंबई येथे असून तिचे माहेर कोल्हापुरातील प्रयाग चिखली येथे आहे.

असह्य प्रसव पीडा सहन केल्या नंतर आणि बाळाच्या जन्मानंतर मातेचे पुनर्जन्म होते असे म्हणतात. पण ही माता कोरोना ग्रस्त झाली आणि माहेरच्या लोकांची काळजी वाढली. अमृताला कोरोनाच्या उपचारासाठी आता कोणत्या दवाखान्यात ठेवायचे या चिंतेने ग्रासले. पण अमृताचा मामा बाळकृष्ण गुरव हे एका दवाखान्यात नोकरीला असल्याने त्यांना वैद्यकीय क्षेत्राची जाण होती. त्यांनी तात्काळ अशोक रोकडे यांच्याशी संपर्क साधला.आणि आपल्या भाचीला आलेली अडचण आणि घरच्यांसमोर उभा ठाकलेला प्रसंग कथन केला. व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता या मातेला तात्काळ व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करायला सांगितले. मध्यरात्री 2 वाजता आपल्या नवजात कन्येसह अमृता गुरव कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाली. बाळाची काळजी घ्यायला तिची जुनी जाणकार आजी सुद्धा याच कोविड सेंटरमध्ये राहिली. अमृताला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आबाजी शिर्के आणि त्यांचे सहायक डॉ.अमोल कोडोलीकर या दोघांच्या देखरेखीखाली तब्बल बारा दिवस उपचार करण्यात आले.या काळात व्हाईट आर्मीच्या नर्स हिना यादवाड यांनी तर दिवसरात्र एक करून अमृताला काय हवंय काय नको याची काळजी घेतली.तिची मनापासून सुश्रूषा केली.सोबतीला व्हाईट आर्मीचे कोरोना योद्धे जवान होतेच.

आता 13 दिवसांनी अमृताच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि त्या पूर्णपणे निगेटिव्ह आल्या आहेत.त्यामुळे अमृता आपल्या नवजात कन्येसह माहेरी चालली आहे..

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
Embed widget