एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर?
नारायण राणे यांचे कट्टर समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळबंकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळबंकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये कालिदास कोळंबकर होते. मात्र राणे आणि कोळंबकर वगळता बहुतांश सर्व शिवसेनेत परतले.
आता कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बीडीडी चाळ पुनर्वसनाच्या कामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यापासून, कालिदास कोळंबकर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत.
यापूर्वीही कोळंबकर हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगली होती. ते सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक करत आहेत.
दुसरीकडे कालिदास कोळंबकर यांची शिवसेनेबरोबरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
कोण आहेत कालिदास कोळंबकर?
कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. ते सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसआधी ते शिवसेनेत होते. मात्र, राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात.
कट्टर राणे समर्थक कोळंबकर!
नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळी जे आमदार राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले, त्यामध्ये आमदार कालिदास कोळंबकरही होते. विशेष म्हणजे राणेंसोबत काँग्रेसमध्ये आलेले बहुतेक आमदार त्यांना सोडून गेले. स्वत: राणेही काँग्रेससोडून गेले. मात्र कोळंबकर तरीही काँग्रेसमध्ये राहून राणेंना पाठिंबा देत राहिले.
...तर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत भाजपमध्ये येतील : कोळंबकर
“भाजपमध्ये जायचं असेल, तर अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येत आहेत आणि माझ्यामुळे पक्षाला किती फायदा होईल, याची जाणीव त्या पक्षाच्या नेत्यांना आहे.”, असे कोळंबकरांनी वर्षभरापूर्वी म्हटलं होतं. त्यादरम्यान राणेंनी काँग्रेस सोडली होती.
संबंधित बातम्या
सडेतोड कोळंबकर... वांद्र्याच्या निवडणुकीपासून राणेंच्या भाजपप्रवेशापर्यंत!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement