एक्स्प्लोर

नोकरदार की व्यावसायिक, सर्वाधिक टॅक्स कोण भरतं?

तुम्ही कामाला/नोकरीला जाताना ज्या फेरीवाल्याकडे चहा-नाश्ता करता, त्या फेरीवाल्याचं उत्पन्न किती आणि तो टॅक्स किती भरतो, याबाबतची आकडेवारी -

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज देशाचा 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये त्यांनी करदात्यांची संख्या वाढल्याचं प्रकर्षाने नमूद केलं. मात्र त्यांनी आकडेवारीद्वारे नोकरदारांना चुचकारताना, करबुडव्या व्यावसायिकांवर निशाणा साधला. त्यांनी जी आकडेवारी सादर केली, ती चकीत करणारी आहे. जेटली म्हणाले, “साधरणत: नोकरदारांपेक्षा व्यावसायिकांचं उत्पन्न जास्त असतं अशी सगळ्यांना समज असतो. त्यामुळे आयकर भरण्यातही व्यावसायिकांचीच संख्या जास्त असेल, असा तर्क काढला जातो. मात्र इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीनुसार, सर्वाधिक वैयक्तिक कर भरणाऱ्यांमध्ये नोकरदारच अग्रेसर आहेत”. यासाठी जेटलींनी 2016-17 या असेसमेंट वर्षाची आकडेवारी सादर केली. 2016-17 मध्ये 1 कोटी 89 लाख नोकरदारांनी 1 कोटी 44 लाख कोटी रुपयांचा कर भरला. म्हणजेच सरासरी 76,306 रुपये प्रती नोकरदार असा कर भरण्यात आला. दुसरीकडे 1 कोटी 88 लाख व्यापारी- व्यावसायिकांनी कर भरला. म्हणजेच कर भरणाऱ्या व्यावसायिकांची संख्या जवळपास नोकरदारांएवढीच आहे. मात्र त्यांनी भरलेला कर हा नोकरदारांच्या तुलनेत खूपच कमी आहे. व्यावसायिकांनी भरलेला कर 48 हजार कोटी रुपये आहे. यांची सरासरी 25,753 रुपये प्रती व्यावसायिक इतकी आहे. म्हणजेच टॅक्स भरणाऱ्यांमध्ये नोकरदारांचीच संख्या जास्त आहे, व्यावसायिकांची संख्या खूपच कमी आहे. नोकरदार नियमित रिटर्न भरतात, पण व्यावसायिक कर चुकवतात किंवा चलाखी करतात, असंच ही आकडेवारी सांगते. डॉक्टर, इंजिनिअर, वकील हे व्यावसायिकांमध्ये येत असले, तरी टॅक्स भरणाऱ्यांमध्ये त्यांची संख्या कमी असल्याचं सांगण्यात येतं. तसंच रस्त्यावर बसणारे व्यावसायिक ज्यांचं उत्पन्न दिवसा 1 हजारापासून ते 10 हजारांपर्यंत आहे, ते सुद्धा टॅक्स कमी प्रमाणात भरतात किंवा भरतच नाहीत. त्यामुळे कर भरणाऱ्यांमध्ये नोकरदारांचीच संख्या जास्त आहे. संबंधित बातम्या Budget 2018: कर रचनेत बदल नाही, प्रत्येक बिल महागणार!  अर्थसंकल्प 2018 : पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, काय-काय महागलं?  अर्थसंकल्प 2018 : सर्व रेल्वेत सीसीटीव्ही आणि वायफाय मिळणार  अर्थसंकल्प 2018 : जेटलींनी देशातील शेतकऱ्यांना काय दिलं?  येत्या वर्षात 70 लाख नोकऱ्या देणार : अरुण जेटली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget