एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार!
मुंबई : भाजपचा मुंबई महापालिकेसाठीचा जाहीरनामा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या (मंगळवार) प्रसिद्ध केला जाणार आहे. यामध्ये अनेक नवनवीन घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय असणार?
- राज्यात सरकारी कार्यालयाला लागू असलेला 'राईट टू सर्व्हिस' (सेवेचा हक्क) प्रमाणे 'राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस' (महापालिका सेवेचा हक्क) कायदा येणार
- जर ठराविक मुदतीत काम केलं नाही तर दंडात्मक कारवाई होणार
- मुंबईकरांना 24 तास पाणी
- पाणी मिळालं नाही तर जबाबदारी महापालिकेची
- महापालिकेविरुद्ध नागरिक दावा देखील ठोकू शकतात
- पाईपलाईन फुटली तर टँकरमधून पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीही महापालिकेची असेल.
- माहिन्यातून एकदा शहरातील सर्व रस्ते धुतले जाणार
- मलनिसाःरणाच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याने शहरातील रस्ते धुतले जाणार
- ग्रीन एनर्जी अंतर्गत शहरात एलईडी दिवे लावणार
- महिलांसाठी अधिक बजेट देणार
- 'राईट टू पी' अंतर्गत महिला शौचालयांसाठी अधिक बजेट
- याशिवाय महापालिकेकडून जे कर आकारले जातात त्यात मुंबईकरांना भरघोस सूट देण्याचं आश्वासन
- पाणी दिलं नाही तर पाणीपट्टी कर नाही
- खड्डेमुक्त रस्ते होईपर्यंत कर लादला जाणार नाही
- मालमत्ता करात सूट
- बाळासाहेब ठाकरे याचं भव्य स्मारक बांधणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement