मुख्यमंत्री भल्या सकाळीच मुंबईच्या पाहणी दौऱ्यावर, 'काम वेळेत करा, बक्षीस देऊ अन्यथा कारवाई करु', शिंदेंची कंत्राटदारांना तंबी
कंत्राटदाराशी संवाद साधत काम वेळेवर पूर्ण करण्याची तंबी देखील दिली. काम वेळेत करा, बक्षीस देऊ अन्यथा कारवाई करु असा इशारा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलाय.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आज महापालिकेच्या पाच विभागागातील पाच वॉर्डांमध्ये स्वच्छता मोहीम आयोजीत करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कार्यक्रमादरम्यान रखडलेल्या गोखले ब्रिजच्या कामाची देखील पाहणी केली. यावेळी कंत्राटदाराशी संवाद साधत काम वेळेवर पूर्ण करण्याची तंबी देखील दिली. काम वेळेत करा, बक्षीस देऊ अन्यथा कारवाई करु असा इशारा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलाय. सोबतच, मुख्यमंत्र्यांसमोर यावेळी सफाई कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी सातच्या सुमारास मुंबईतील जुहू बीच (CM at Juhu) या ठिकाणी जाऊन स्वच्छ मुंबई मोहिमेचा (Clean Mumbai) प्रारंभ केला. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: रस्त्यावर पाणी मारुन रस्ते स्वच्छ केले.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पाहाणी करत पायी मार्गस्थ झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत स्वत: रस्त्यावर पाणी मारुन रस्ते स्वच्छ केले. मुंबई महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करत होते, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पाईप हातात घेऊन, रस्त्यांवर पाणी मारलं.
पाच विभागांमध्ये मोहीम
- जुहू बीच येथील महात्मा गांधी पुतळा परिसर,
- विलेपार्ले येथील नेहरु रस्ता; शहाजी राजे महानगरपालिका शाळा
- अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपूलाजवळ
- कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल गेटवर
- घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर, राजावाडी रुग्णालय, राजावाडी उद्यान
- टिळक नगर येथील सह्याद्री क्रीडा मंडळ मैदानजवळ
परिमंडळ 3 मध्ये के पूर्व विभाग, परिमंडळ 4 मध्ये के पश्चिम विभाग, परिमंडळ 5 मध्ये एम पश्चिम विभाग, परिमंडळ 6 मध्ये एन विभाग आणि परिमंडळ 7 मध्ये आर दक्षिण विभागात व्यापक स्तरावर व सखोल, सर्वांगीण स्वच्छता केली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान निवडलेल्या विभागातील रस्ते - पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा, कर्मचारी वसाहतींमध्ये स्वच्छता, फेरीवाला विरहीत क्षेत्र, राडारोडा (डेब्रीज) मुक्त परिसर, केबल्स व वायर्स यांचे जाळे हटवणे आदी कार्यवाही केली जाणार आहे.
हे ही वाचा :
Nawab Malik : सत्ताधारी भाजप शिंदे गटाने नवाब मलिकांना घेरले, पण प्रफुल्ल पटेलांवर 'मौनव्रत'; अजित पवार गट लेटरबाॅम्ब टाकणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला!