एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अवयव प्रत्यारोपणास नकार देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई : मुख्यमंत्री
मुंबई : अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद करण्याची भूमिका घेणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. डॉक्टरांनी याप्रकरणी कोणतीही आडमूठी भूमिका घेऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
हिरानंदानी रुग्णालयात एका बड्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी एजंटसह अनेक डॉक्टरांना अटकही केली गेलीय. या कारवाईनंतर डॉक्टरांच्या संघटनेनं यापुढे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय बोलून दाखवला होता.
कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर केवळ प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे अवैध किडनी प्रकरणावर त्यांचा हात असेलच, असं मानणं चुकीचं असल्याचं इतर डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना डॉक्टरांनी याप्रकरणी कोणतीही आडमूठी भूमिका घेऊ नये, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement