एक्स्प्लोर
ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार : मुख्यमंत्री
दोनच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कर्त्यकर्त्यांशी साधलेला संवाद पालघरमधल्या भर सभेत चव्हाट्यावर आणला होता. त्यावरुन आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.
![ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार : मुख्यमंत्री CM Devendra Fadanvis criticized Uddhav Thackeray over Audio clip ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार : मुख्यमंत्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/27174213/CM-PC.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पालघर निवडणुकीच्या निमित्तानं गाजलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपवरुन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे. शिवसेनेनं या क्लिपमध्ये फेरफार करुन ऐकवल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
आज मुंबईत मोदी सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. इतकंच नव्हे, तर ही संपूर्ण ऑडिओ क्लिप आपणच निवडणूक आयोगाला पाठवल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
दोनच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कर्त्यकर्त्यांशी साधलेला संवाद पालघरमधल्या भर सभेत चव्हाट्यावर आणला होता. त्यावरुन आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.
काय आहे ही फडणवीसांची कथित ऑडिओ क्लिप?
एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?
ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही
आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे
ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...
साम, दाम, दंड, भेद...
ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.
कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.
'अरे ला कारे'च करायचं..
'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्रीसाहेब, साम-दाम-दंड-भेदचा अर्थ समजावून सांगा : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप सादर
जनाची नाही, मनाची तरी ठेव, मुख्यमंत्र्यांचं आदेश बांदेकरांवर टीकास्त्र
पालघर LIVE : पैसे वाटपप्रकरणी 12 जणांवर गुन्हा
'क्लिप खरी असेल तर फडणवीसांचा राजीनामा घ्या, खोटी असल्यास उद्धव ठाकरेंवर कारवाई करा'
पालघर पैसे वाटप: सेनेचे दिग्गज नेते रात्री 2 वा. डहाणू पोलिसात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)