एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांकडून मिलिंद नार्वेकर, कृपाशंकर सिंह यांच्या बाप्पाचं दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसचे मुंबईतील मोठे नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. या दोन्ही भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसचे मुंबईतील मोठे नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. या दोन्ही भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नार्वेकरांच्या घरी मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग चौथ्या वर्षीय शिवसेना पक्षप्रमुख यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री फडणवीस रात्री साडेनऊच्या सुमारास नार्वेकर यांच्या पाली हिल इथल्या निवासस्थानी गेले होते.
नार्वेकर आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीनं पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीची चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे शिवसेनेला मनवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या बाप्पाचंही दर्शन
मिलिंद नार्वेकर यांच्या गणपतीनंतर मुख्यमंत्री थेट काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनं पुन्हा एकदा कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिंह भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यात निवडणुका जवळ आल्या आहेत. अशावेळी गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानं पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात झालीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement