एक्स्प्लोर
वडाळा-घाटकोपर- ठाणे- कासारवडवली मेट्रोला मंजुरी, 32 किमीवर 32 स्टेशन
मुंबईः मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. कारण वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. हा 32 किलोमीटर आणि 32 स्टेशनचा मेट्रो मार्ग असून यासाठी 14 हजार 549 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. अंतिम मंजुरीसाठी प्रकल्पाचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
32 स्थानकांचा समावेश
वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो मार्गावर एकूण 32 स्थानकांचा समावेश आहे.
32 स्टेशन
भक्ती पार्क मेट्रो - वडाळा टीटी - अणिक नगर बस डेपो- सुमन नगर- सिद्धार्थ कॉलनी-अमर महल जंक्शन - गरोदिया नगर - पंत नगर -लक्ष्मी नगर - श्रेयस सिनेमा- गोदरेज कंपनी - विक्रोळी मेट्रो - सूर्या नगर - गांधी नगर - नवल हौसिंग - भांडुप महापालिका - भांडुप मेट्रो - शांग्रिला - सोनापूर - मुलुंड फायर स्टेशन- मुलुंड नाका - तीन हात नाका- ठाणे आरटीओ- मनपा मार्ग- कॅडबरी जंक्शन - माजीवडा - कापुरबावडी - मानपाडा - टिकूजी-नी-वाडी - डोंगरी पाडा- विजय गार्डन - कासारवडवली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement