एक्स्प्लोर

डोंबिवली एमआयडीसीतील जीवघेण्या कंपन्या बंद करा, जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या रहिवाशांची मागणी

डोंबिवली एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांमुळे डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे. या कंपन्यामुळे जीव मुठीत धरुन राहण्याची वेळी या नागरिकांवर आली आहे. त्यामुळे या जीवाच्या काळजीपोटी जीवघेण्या कंपन्या बंद करण्याची मागणी डोंबिवलीतील नागरिक आता करत आहेत.

डोंबिवली : डोंबिवली शहराला लागून असलेल्या एमआयडीसीमुळे येथील नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. काल मेट्रोपोलिटन कंपनीला लागलेल्या आगीनंतर नागरिकांचा रोष बाहेर येऊ लागला असून आता या कंपन्या बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. डोंबिवली एमआयडीसीतल्या मेट्रोपोलिटन कंपनीला काल भीषण आग लागली आणि डोंबिवलीत हाहा:कार माजला. या कंपनीत असलेल्या धोकादायक केमिकलच्या स्फोटांनी डोंबिवली अक्षरशः हादरुन गेली. मात्र या आगीनंतर आता अशा धोकादायक कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. कारण या कंपन्यांमुळे डोंबिवलीकर अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. डोंबिवलीच्या ज्या मेट्रोपोलिटन कंपनीला आग लागली होती, त्यात केमिकलचा प्रचंड मोठा साठा होता. आग लागल्यानंतर या केमिकलच्या ड्रमचे स्फोट होऊ लागले. मात्र सर्वात भयंकर होत्या त्या कंपनीतल्या भूमिगत केमिकलच्या टाक्या. कारण या टाक्यांमध्ये थोडंथोडकं नव्हे, तर तब्बल 13 टन ज्वलनशील केमिकल भरलं होतं. या टाक्या फुटल्या असत्या, तर किमान अर्धा किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला असता. त्यामुळे आता यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. Dombivli Fire | डोंबिवलीतली आग दुसऱ्या दिवशीही धुमसतीच, परिसरात धुराचं साम्राज्य काल लागलेल्या आगीनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने मेट्रोपोलिटन कंपनीवर कारवाई केली असून त्यांना उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली आहे. कंपनीची चौकशी करून तांत्रिक तपासाअंती कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक विनायक लोंढे यांनी दिली आहे. मेट्रोपोलिटन कंपनीला लागलेल्या आगीच्या काही दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याच भागात गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी कंपन्यांनी सुरक्षात्मक उपायोजना केल्या नाहीत, तर कंपन्यांना टाळं ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे आता तरी अशा घातक रासायनिक कंपन्यांवर कारवाई होते का? आणि या कंपन्या इथून अन्यत्र स्थलांतरित केल्या जातात का? हे पाहावं लागेल. Dombivli Fire | डोंबिवलीतील केमिकल कंपनीला लागलेली आग दहा तासानंतरही धुमसतीच, संपूर्ण शहरावर धुराचे ढग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget