एक्स्प्लोर
Dombivli Fire | डोंबिवलीतील केमिकल कंपनीला लागलेली आग दहा तासानंतरही धुमसतीच, संपूर्ण शहरावर धुराचे ढग
कंपनीत असलेल्या केमिकलच्या काही ड्रम्सचा मोठा स्फोट झाला. यामुळे एमआयडीसी निवासी विभागात असलेल्या काही इमारतींना हादरे बसले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून कसोशीचे प्रयत्न केले जात आहेत.
डोंबिवली : डोंबिवलीतील केमकिल कंपनीला लागलेली आग अजूनही धुमसतीच आहे. या भीषण आगीमुळे संपूर्ण शहरावर धुराचे ढग पसरले आहेत. या आगीमुळे घाबरलेल्या काही स्थानिकांनी तात्पुरता घरातून पळ काढला आहे. दुपारी 12 वाजता मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीला आग लागली आहे. दहा तासाहून अधिक वेळापासून ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळं परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
डोंबिवली येथील मेट्रोपॉलिटन कंपनीला लागलेल्या आगीला दहा तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. तरीही ही आग अजून पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. डोंबिवली एमआयडीसी परिसरात धूर पसरला आहे. मेट्रोपॉलीटीन ही केमिकल कंपनी आहे. या कंपनीतील आग नियंत्रणात आणणे हे अग्निशमन दलापुढचे आव्हान आहे. गेल्या सात तासांपासून अग्निशमन दलाचे जवान ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. केमिकल कंपनी असल्याने ही आग नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागतो आहे. फोम आणि पाणी यांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
GST Bhavan | जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार; व्हीजेटीआयच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून उघड
आगीमुळं डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या सर्व शाळा दुपारीच सोडण्यात आल्या. आजूबाजूच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आलं आहे. त्या परिसरातल्या रहिवाशी इमारतीतल्या लोकांना गरज लागली तर खाली करण्याची तयारी ठेला अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मेट्रोपॉलिटन एक्सिकेम कंपनीत शाई, प्लास्टिक, फार्मास्युटिकल्ससाठी लागणारं केमिकल्स बनवलं जातं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि त्यानंतर पसरत गेली. या आगीमुळे एमआयडीसी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही वेळापूर्वीच या कंपनीत स्फोटाचे दोन आवाज आले आणि आगीचा आणखी भडका उडाला. त्यानंतर अग्निशमन दलाचे10 बंब आले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
बीड
महाराष्ट्र
Advertisement