Mumbai: दारूच्या नशेत ओलांडली मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची भिंत; तरुणाला अटक
Mumbai: विमानतळ हा हाय सिक्युरिटी झोनमध्ये येत असल्याने अनेक एजन्सी त्या व्यक्तीची प्रत्येक प्रकारे चौकशी करत आहेत.
Mumbai: दारूच्या नशेत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची भिंत ओलांडणाऱ्या एका तरुणाला सीआयएसएफनं ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांकडं सोपवण्यात आलंय. ही घटना आज सकाळी घडलीय. या घटनेनंतर मुंबई विमानतळावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसेच विमानतळावर ये-जा करणाऱ्या लोकांचीही कसून तपासणी केली जात आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी विमानतळाच्या भिंतीवर चढणाऱ्या एका व्यक्तीला सीआयएसएफनं ताब्यात घेतलंय. कुर्लाच्या जरीमरीच्या बाजूनं विमानतळाची सुरक्षा भिंतीवरून उडी मारून संबंधित तरूणानं विमानतळावर प्रवेश केला. मात्र, त्यावेळी गस्त घालणाऱ्या सीआयएसएफच्या पथकानं त्याला पकडलं, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी या तरूणाला ताब्यात घेतलं, तेव्हा त्यानं मद्यपान केल्याचं चौकशीतून समोर आलंय. दरम्यान, त्याची चौकशी केली असात त्याच्याकडं कोणतीही स्फोटक किंवा इतर संशयित वस्तू आढळली नाही. त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं वय 20 ते 22 आहे. तसेच त्यानं फाटके कपडे घातले होते.संशयित व्यक्ती नशेच्या अवस्थेत आहे आणि तो काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही, अगदी त्याचं नावही सांगू शकत नाही", अशीही माहिती अधिकाऱ्यानं दिलीय.
महत्वाचं म्हणजे, विमानतळ हा हाय सिक्युरिटी झोनमध्ये येत असल्याने अनेक एजन्सी त्या व्यक्तीची प्रत्येक प्रकारे चौकशी करत आहेत. तसेच त्याचा कोणत्याही देशद्रोही लोकांशी संबंध आहे का? याचाही तपास केला जात आहे, असंही अधिकाऱ्यानं सांगितलंय.
हे देखील वाचा-
- Akola : अकोल्यात 'दिल चाहता है'! 27 वर्षाच्या महिलेचं 17 वर्षीय मुलावर प्रेम, महिलेला बेड्या
- MHADA Exam Paper Leak : म्हाडा पेपर फुटीप्रकरणी तीन दलालांना अटक, उमेदवारांकडून उकळले कोट्यवधी रुपये
- Dombivli Murder: डोंबिवलीत सोफा सेटमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकळलं; आरोपीच्या चप्पलेमुळं फुटलं बिंग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha