एक्स्प्लोर
Advertisement
Cidco Lottery 2018: सिडको लॉटरी, घरांच्या किमती, एरिया आणि सर्व काही
नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत. एमएमआरडीए रेंजमध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागात ज्यांच्या नावावर घर आहे, त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.
नवी मुंबई : नवी मुंबईत सिडकोच्या (शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ) घरांची बम्पर लॉटरी जाहीर झाली आहे. सिडकोने एकाच वेळी तब्बल 14 हजार 838 घरांची लॉटरी काढली असून, याचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी होणार आहे.
नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत. एमएमआरडीए रेंजमध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागात ज्यांच्या नावावर घर आहे, त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.
आज अर्थात 13 ऑगस्टला लॉटरीचे सर्व तपशील जाहीर झाले आहेत. यासाठी 15 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 18 लाखांचे घर असून 25.81 चौ.मी. ( 277 चौरस फूट) एवढं क्षेत्र आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 26 लाखांच्या घराचा एरिया 29.82 चौ.मी. (320 चौरस फूट) आहे. लॉटरीच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या या घरांचा ताबा 2019 च्या शेवटी देण्यात येणार आहे.
नवी मुंबईत सिडकोची महालॉटरी, कोणत्या भागात किती घरं?
ज्यांचं उत्पन्न 25 हजार रुपयांपर्यंत आहे ते आर्थिक दुर्बल गटात येतील. तर ज्यांचं उत्पन्न 25,001 ते 50 हजार रुपयांपर्यंत आहे, ते अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करु शकतील.
50 हजार रूपयांपेक्षा जास्त पगार असणाऱ्या व्यक्तिंना या योजनेत सहभागी होता येणार नाही. या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे.
एकूण घरे : 14 हजार 838
- आर्थिक दुर्बल घटकांसाठी : 5 हजार 262
- अल्प उत्पन्न गटासाठी : 9 हजार 576
- आर्थिक दुर्बल गट : अनामत रक्कम 5 हजार रुपये, अर्ज शुल्क 280, एकूण - 5280
- अल्प उत्पन्न गट : अनामत रक्कम 25 हजार रुपये, अर्ज शुल्क 280, एकूण - 25280
- आर्थिक दुर्बल गट : तळोजा 2862, खारघर 684, कळंबोली 324, घणसोली 528, द्रोणागिरी 864
- अल्प उत्पन्न गट : तळोजा 5232, खारघर 1260, कळंबोली 582, घणसोली 954, द्रोणागिरी 1548
- अर्जदारांची ऑनलाईन नोंदणी: 13/08/2018 दुपारी 2 पासून ते 16/09/2018 रात्री 11.59 पर्यंत
- ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत: 15/08/2018 दुपारी 2 पासून ते 16/09/2018 रात्री 11.59 पर्यंत
- अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम ऑनलाईन भरण्याची मुदत: 15/08/2018 दुपारी 2 पासून ते 17/09/2018 सायंकाळा 6 पर्यंत
- ऑनलाईन सोडत – 02/10/2018 सकाळी 11 वा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement