एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : "मी एकटा नाही, माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव"; छगन भुजबळांचे वक्तव्य

Chhagan Bhujbal : मी एकटा नाही, माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव आहेत, असे वक्त्यव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मंत्री त्यांनी दिली आहे.

Chhagan Bhujbal मुंबई : काल ओबीसी (OBC) नेत्यांची बैठक पार पडली. यात तीन ठराव मंजूर करण्यात आले. आज सोमवारी (दि. 29) पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. तसेच मी एकटा नाही, माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव आहेत, असे वक्त्यव्य त्यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. 

छगन भुजबळ म्हणाले की, काल रात्री ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. काल जे नेते उपस्थित होते ते नेते आज उपस्थित राहणार आहेत. दिवसभर कोणाची काय चर्चा आहेत. हरकती नोंदवायच्या आहेत. या संदर्भात चर्चा होणार आहे. जाहीर सभा होणार आहे. त्याचे देखील काम सुरू आहे. ओबीसी यात्रा काढायची आहे.  त्या संदर्भात देखील कमिटी नेमलेली आहे. मार्ग आणि दिवस कोणता असेल याबाबत देखील काम करण्याची तयारी सुरू आहे. 

374 जातींचे आरक्षण संपल्यात जमा झाले

छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही, असे बबनराव तायवाडे यांनी म्हटले. यावर छगन भुजबळांना विचारणा केली असता ते म्हणाले की, नसेल तर नसेल. आमच्यात 374 वाटेकरी होते. त्यांना आम्ही सामावून घेतलं होतं. आता हजार वाटेकरी आहेत. ओबीसींच्या 54 टक्क्यांमध्ये आणखी 20 ते 25 टक्के लोक घुसवले. शाहू महाराजांनी आरक्षण देताना सांगितलं होतं की, डुबले आहेत त्यांना आरक्षण द्यावे. 374 जातींचे आरक्षण संपल्यात जमा झाले असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही बोलतो. 

आरक्षण समाप्त होतंय, त्याची आग आमच्या मनात

सरकारमध्ये तुम्ही एकटे पडलात का? अशी विचारणा केली असता छगन भुजबळ म्हणाले की,  मी कसला एकाकी पडलो, माझ्यासोबत करोडो ओबीसी बांधव सोबत आहेत. ओबीसीमध्ये जाणीवपूर्वक करोडो लोक बॅकडोअरने घुसवतात हे जाणीवपूर्वक आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येथे मंत्र्याचा, मंत्रिमंडळाचा, सरकारचा कसला संबंध नाही. इथे माझ्या ओबीसी समाजाचे आरक्षण समाप्त होते आहे. त्याची आग आमच्या मनात भडकते आहे, असे प्रत्युतर त्यांनी संजय राऊत यांना दिले. 

द्या ना त्यांना वेगळे आरक्षण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, ते भेटतील तेव्हा मी सांगणार की आग कशी कमी करणार आहात. मी त्यांना सांगणार आहे की, द्या ना त्यांना वेगळे आरक्षण, कशाला आमच्यात घुसवत आहात. ओबीसी समाजातून मराठा आरक्षण द्यायला सुरुवात झाली मग थांबवा ना ते, असे भुजबळ म्हणाले. 

मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही

सरकारमध्ये राहून लढणार की बाहेर पडून लढणार अशी विचारणा केली असता भुजबळ म्हणाले की, हे सरकारने आणि माझ्या पक्षाने ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, मला त्याची चिंता नाही. मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. सरळ जाऊन सांगा तुम्ही याला काढा, असेही छगन भुजबळ म्हणाले.

आणखी वाचा 

राज ठाकरेंच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच ठाकरे गटाची सहमती; संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून मराठ्यांची फसवणूक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget