(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज ठाकरेंच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच ठाकरे गटाची सहमती; संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून मराठ्यांची फसवणूक
भुजबळ वेगळी तर फडणवीस वेगळी भूमिका घेतात. मुख्यमंत्र्याची भूमिका ही सरकारची असायला हवी. मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात. हे सगळं ठरवून चाललं आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
पुणे : 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधनाचा अपमान केला जात आहे. भाजपचा हस्तक म्हणून नार्वेकरांनी निकाल दिला आहे. संविधान आणि घटनेचा हा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. तसेच मराठा आरक्षणाप्रकरणी (Maratha Reservation) राज ठाकरेंचा (Raj Thackeray) प्रश्न योग्य आहे, मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत. जरांगे पाटील साधा माणूस आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मुंबई (Mumbai) आंदोलनानंतर सरकारने काढलेल्या अध्यादेशावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, सरकारने अध्यादेश काढला पण खरच आरक्षण मिळालं आहे का अशी अनेकांना शंका आहे. राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे. मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत. जरांगे पाटील साधा माणूस आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरील गुंडांचे बॉस आहेत. मंत्री मंडळात मतभेद स्पष्ट दिसतात. भुजबळ वेगळी तर फडणवीस वेगळी भूमिका घेतात. मुख्यमंत्र्याची भूमिका ही सरकारची असायला हवी. मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात. हे सगळं ठरवून चाललं आहे.
मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात : संजय राऊत
आमदार नितेश राणेंवर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचं आम्ही ओबीसींच्या बाजूने बोलणार. मुख्यमंत्र्यांची भुमिका ही सरकारची असते मंत्री विरोधात भुमिका घेत असेल तर सरकार बरखास्तीची शिफारस हवी. तस होत नाही म्हणजे त्यांची मिलीभगत आहे. हे केंद्राच्या हातातील अधिकार आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी म्हटलं की, 'मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !'
भाजपचा हस्तक म्हणून नार्वेकरांनी निकाल दिला : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, हा सर्वात मोठा फ्रॉड आहे. ज्या व्यक्तीने दहा पक्षांतर करुन पचवली आहे. ज्या प्रकारची पक्षांतर केली त्या फुटीर गटाला मान्यता दिली. आंबेडकरांचा हा अपमान आहे भाजपचा हस्तक म्हणून नार्वेकरांनी निकाल दिलाय. संविधान आणि घटनेचा हा अपमान आहे.
राहुल कुल यांना नोटीसा पाठवताना तुमची शाई संपते का? राऊतांचा सवाल
मुलुंडच्या विक्रांतबचावच्या नावाखाली कोट्यावधीचा घोटाळा केला. सरकार आल्यावर गुन्हा मागे घेण्यात आला. राहुल कुल यांनी 500 कोटींचा घोटाळा केला आहे . त्यांना नोटीसा पाठवताना तुमची शाई संपते का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. अजित पवारांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केला . हसन मुश्रीफांचा एक पाय तुरुंगात आहे. काही लोकं घाबरतात आम्ही घाबरलो नाही . आमचं पण सरकार येईल तेव्हा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल . तुम्ही आम्हाला घाबरताय म्हणून खोट्या प्रकरणात अडकवत आहे, असे देखील राऊत म्हणाले.
हे ही वाचा :