एक्स्प्लोर
लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा
मुंबई : ऐन पिक अवरला मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेनची वाहतूक कोलमडली आहे. विक्रोळीजवळ स्लो ट्रॅकवर लोकल ट्रेन बंद पडल्याने सीएसटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
सुमारे अर्धातास ही लोकल एकाच ठिकाणी उभी राहिल्यानंतर बिघाड दुरुस्त करुन मार्गस्थ करण्यात आलं आहे. बंद पडलेली लोकल रुळावरुन हटवली असली तरी वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावर वळवल्याने वाहतूक 20 मिनिटं उशिराने सुरु आहे.
मात्र या खोळंब्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत. दरम्यान, बिघाड झालेली लोकल रवाना झाल्याने धीम्या मार्गावरची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement