एक्स्प्लोर
मध्य रेल्वेचा बोजवारा, तीन स्टेशनवर तांत्रिक बिघाड

मुंबई : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. तीन स्टेशनवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन आणि मुंब्रा स्टेशनवर पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर त्याच भरीस भर म्हणून विक्रोळी स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटली आहे. यामुळे धीम्या आणि जलद ट्रॅकवरील अप-डाऊन मार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प आहे. 40 ते 50 मिनिटं गाड्या एकाच जागेवर उभ्या आहेत. हा बिघाड कधी दुरुस्त होणार याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र मध्य रेल्वेच्या या खोळंब्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























