एक्स्प्लोर
ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून कल्याण ते बदलापूर शटल बससेवा सुरु करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी अप-डाऊन रेल्वेसेवा विस्कळीत झाली.
कल्याण : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विठ्ठलवाडी ते कल्याण स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप-डाऊन गाड्या खोळंबल्या आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सकाळी साडेआठच्या सुमारास विठ्ठलवाडी ते कल्याण स्टेशनदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. त्यानंतर ओव्हरहेड वायर तुटली, परिणामी रेल्वेसेवा ठप्प आहे. मागील दीड ते दोन तासापासून एकही लोकल कल्याण ते कर्जत मार्गावर धावलेली नाही.
ओव्हरहेड वायर खाली कोसळल्याने दरवाजात उभे असलेले चार ते पाच प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यात दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
सध्या ओव्हरहेड वायर आणि लोकलच्या पेंटाग्राफच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. विठ्ठलवाडी ते कल्याण स्टेशनदरम्यान प्रवासी रुळावरुन चालत जात आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने शटल बससेवा सुरु केली आहे. परंतु कल्याण, डोंबिवली तसंच विठ्ठलवाडीदरम्यान ट्रॅफिकची मोठी समस्या असल्याने त्याचा फारसा उपयोग या भागात होताना दिसत नाही.
दरम्यान, मुंबईकडे येणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनही डोंबिवली आणि ठाणे स्टेशनवर थांबा देण्यात येत आहे, जेणेकरुन लोकल ट्रेनवरील भार कमी व्हावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement