(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईकरांसाठी खुशखबर! केंद्राकडून 300 नव्या लोकलचं गिफ्ट, पालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी फिट
Mumbai Local News : जोगेश्वरीमध्ये नवीन टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्ससाठी 7 हजार 927 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत 132 जागा जिंकणाऱ्या भाजपनं आता मुंबई आणि आसपासच्या महापालिकाच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचं चित्र दिसत आहे. केंद्र सरकारनं मुंबईसाठी रेल्वेच्या तीन योजनांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार मुंबईतल्या उपनगरीय लोकल सेवेत 300 नव्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्सची, तसंच मध्य रेल्वेवरच्या परळ, लोकमान्य टिळक टर्मिनल, कल्याण आणि पनवेल टर्मिनलची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवरच्या जोगेश्वरी आणि वसई रोड स्थानकांवर नवी टर्मिनल्स उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करून पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
मुंबई के लिए 300 नई लोकल ट्रेनें, वसई में मेगा रेल टर्मिनल!🚆
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2024
धन्यवाद मा. प्रधानमंत्री मोदी जी और अश्विनी वैष्णव जी !
समृद्ध एवं विकसित महाराष्ट्र की दिशा में रेलवे की तीन बड़ी परियोजनाओं को मंजूरी देकर जन एवं विकास हितैषी महत्वपूर्ण निर्णय लेने हेतु मा. प्रधानमंत्री नरेंद्र… pic.twitter.com/i3lxbK8F4B
राज्यामध्ये महायुतीचं बहुमताचं सरकार सत्तेत आल्यानंतर आता मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरही सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. त्याचाच भाग म्हणून केंद्राकडून आता महाराष्ट्राला आणि मुंबईला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येतोय.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबईकरांना 300 नव्या लोकलचं गिफ्ट देण्यात आलं आहे. तर जोगेश्वरीमध्ये नवीन टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्ससाठी 7 हजार 927 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
कोणते निर्णय घेण्यात आले?
- पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर.
- मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेलच्या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय.
- मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय.
- जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल आणि वसई येथे नवीन मेगा रेल्वे टर्मिनल.
- मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत 300 अतिरिक्त गाड्या जोडल्या जातील.
पर्यटनासाठीही मोठा निधी
सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी 47 कोटी तर नाशिकमध्ये रामकाल पथच्या विकासासाठी 99 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्यातली पर्यटनस्थळं जागतिक दर्जाची करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.
ही बातमी वाचा: