एक्स्प्लोर

जेडे हत्याकांड प्रकरणी आरोपींच्या दोषमुक्तीला सीबीआयकडून हायकोर्टात आव्हान

जेडे हत्याकांडप्रकरणी मुंबईतील विशेष मोक्का कोर्टानं निर्दोष मुक्त केलेल्या पत्रकार जिग्ना व्होरा आणि स्थानिक नेता जॉन पॉल्सन जोसेफ यांच्या दोषमुक्तीला सीबीआयनं हायकोर्टात आव्हान दिलं.

मुंबई : जेडे हत्याकांडप्रकरणी मुंबईतील विशेष मोक्का कोर्टानं निर्दोष मुक्त केलेल्या पत्रकार जिग्ना व्होरा आणि स्थानिक नेता जॉन पॉल्सन जोसेफ यांच्या दोषमुक्तीला सीबीआयनं हायकोर्टात आव्हान दिलं. यापैकी पॉल्सनविरोधात दाखल केलेल्या अपीलावर बुधवारी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अपीलाची माहिती कोर्टाला दिली. मात्र प्रतिवादींच्यावतीनं कुणीच हजर नसल्यानं कोर्टानं या प्रकराची सुनावणी तीन आठवड्यांकरता तहकूब केली. तर जिग्ना व्होराच्या अपीलावरील सुनावणी 18 मार्चला होणार आहे. काय आहे प्रकरण? 11 जून 2011 रोजी एका इंग्रजी दैनिकाचे जेष्ठ पत्रकार जोतिर्मय डे यांची पवई येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या छोटा राजनच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना वोरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरूण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ व दिपक सिसोडीया यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. छोटा राजन विरोधात महाराष्ट्रात एकूण 70 गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये जे. डे यांच्या हत्येचाही समावेश होता. राजनचा ताबा सीबीआयकडे असल्याने हे प्रकरणही तपासासाठी सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आले व तशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. विशेष मोक्का न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्यासमोर हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा अंतिम निकाल सुनावताना पुराव्यांअभावी कोर्टानं जिग्ना व्होरा आणि पॉल्सन जोसेफ यांना दोषमुक्त केलं होतं. महत्त्वाचे म्हणजे या हत्येचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या यादीत साक्षीदार असलेला रवि राम हा सीबीआयच्या आरोपपत्रात आरोपी दाखवण्यात आला आहे. रामने राजनच्या सांगण्यावरून पॉल्सनमार्फत 20 परदेशी सिमकार्ड मारेक-यांना पुरवल्याचा सीबीआयचा आरोप आहे. तसेच जे. डे यांची माहिती राजनला दिल्याचा आरोप असलेली पत्रकार जिग्ना वोरा व राजन यांच्यात झालेले संभाषणही सीबीआयच्या आरोपपत्रात आहे. फॉरेंसिक लॅबने या दोघांच्या आवाजाचे नमूने तपासले असून संभाषणातील आवाज त्यांचाच असल्याचा अहवाल दिला आहे. आरोपपत्रात राजनसह इतर आरोपींवर हत्या, हत्येचा कट, शस्त्र प्रतिबंधक कायदा व मोक्का अंतर्गत आरोप ठेवण्यात आला होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
Jalgaon Crime : चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case:Vishnu Chate च्या मोबाईवरून Walmik Karad ने खंडणी मागितली?आवाजाचे सॅम्पल घेणारSanjay Raut PC : मविआतील तिन्ही पक्षात समन्वय राहिला नाही हे सत्य : संजय राऊतJalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखलMumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
Jalgaon Crime : चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
Aaditya Thackeray Viral Video: तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Embed widget