Cancer patient | मुंबईतल्या कॅन्सर अन् कोरोना संसर्गाशी एकाच वेळी लढणारे 126 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईतील एनएससीआय डोम सेंटरमध्ये कोविड बाधित 178 कर्करोगरुग्णांवर उपचार सुरू होते. पैकी 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील एकही रुग्ण सुदैवाने दगावला नसून ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे.
मुंबई : परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग व कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 178 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले आहे. त्यातून 126 जण बरे झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे कोणताही गंभीर आजार असला तरी योग्यवेळी उपचार मिळाल्यास कोरोना बाधित रुग्ण बरा होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
कोरोनाचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा कॅन्सर, डायबेटीस, ह्रदयविकार यांसारखे आजार आहेत. त्यांना धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मुंबईत टाटा स्मृती कर्करोग उपचार रुग्णालयात देशभरातून विविध कर्करोगांनी ग्रस्त नागरिक उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती खालावलेली असते. त्यात कोरोनाचीदेखील लागण झाल्यास त्यांच्या जीविताला मोठा धोका असतो. त्यामुळे, टाटा हॉस्पिटलमधील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत.
लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही; गर्दी करु नका, सूचनांचं पालन करा : CMO चं ट्वीट
126 जणांवर यशस्वी उपचार
टाटा रुग्णालयातून डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या दोन वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते 77 वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांसह एक विदेशी नागरिकही त्यात आहे. दाखल रुग्णांपैकी बहुतांश हे 50 वर्ष वयावरील आहेत. आतापर्यंत एकूण 178 कोरोना बाधित कर्करुग्ण डोम कोरोना केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल झाले. पैकी 126 जणांना यशस्वी उपचार देऊन, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. यामध्ये एका विदेशी नागरिकाचाही समावेश आहे. तर 52 जणांवर उपचार सुरु आहेत. यातील एकही रुग्ण सुदैवाने दगावला नसून ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे.
जगभरात कर्करुग्णांमध्ये कोरोनाची लागण झाल्यास त्यांतील मृत्युंचे प्रमाण हे तब्बल 50 टक्के इतके आहे. विशेषत: पाश्चात्त्य देशांमध्ये हा अनुभव आला आहे. कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोरोनाची बाधा झालेल्या कर्करोग ग्रस्तांना सर्वसाधारण कोरोना उपचार केंद्रांमध्ये एकत्रित ठेवता येत नाही, त्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते. मागील 20 दिवसांत मुंबईमध्ये कोविड बाधित एकाही डायलिसिस रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
Lockdown | लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही; मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्वीट