एक्स्प्लोर

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही; गर्दी करु नका, सूचनांचं पालन करा : CMO चं ट्वीट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये बोलताना परिस्थिती हाताबाहेर गेली तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावर लॉकडाऊन वाढल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच लॉकडाऊन 5 मध्ये अनेक गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्याने शिथील केला जात आहे. परंतु, अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचं निश्चित झाल्याच्या अफवा पसरत होत्या. आता या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, असं स्पष्टिकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्वीट :

सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा थांबवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये, 'लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या.' असं नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले होते की, 'परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल.' त्यांच्या या वक्तव्यामुळे लॉकडाऊन पुन्हा कठोर होणार असल्याच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. त्यामुळे या अफवा थांबवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट करत स्पष्टिकरण देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ : गर्दी वाढली तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते की, 'कोरोनाविरुद्धचा लढा आपला संपलेला नाही तो सुरुच आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने आपण हटवत आहोत. कोरोनासोबत जगतांना आपल्याला सावधानता बाळगायची आहे. मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या सवयी अंगी बाळगायच्याच आहेत. गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही. संकट अजून टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

...तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 3 ऑगस्टपासून, मुख्यमंत्र्यांची माहिती

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे : मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
Embed widget