एक्स्प्लोर
भिवंडीत इमारत कोसळली, चौघांचा मृत्यू, इमारतीचा मालक अटकेत
सकाळी साडेआठच्या सुमारास इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली.
भिवंडी (मुंबई) : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा चौघांवर पोहोचला आहे. तर 8 जण जखमी असून त्यांच्यावर इंदिरा गांधी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.
आज (शनिवार) पहाटे या दुर्घटनेतल्या ढिगाऱ्याखालूनही एका महिलेचा मृतदेह काढण्यात आला. रूक्सार खान, अश्फाक खान आणि जैबुन्निसा अन्सारी अशी मृतांची नावं आहेत तर पहाटे काढण्यात आलेल्या महिलेचं नाव अद्याप कळू शकलं नाही. तर 8 जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भिवंडीच्या नवी वस्ती भागात काल (शुक्रवार) सकाळी 4 मजली इमारत कोसळली. या इमारतीमध्ये एकूण 7 कुटुंब राहत असल्याची माहिती आहे. दरम्यान इमारतीचा मालक ताहीर अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.
अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफची दोन पथकं घटनास्थळाकडे रवाना झाली असून, एनडीआरएफच्या पथकाला लवकरात लवकर पोहोचता यावं, यासाठी ग्रीन कॉरिडोअर तयार करण्यात आले होते.
https://twitter.com/ANI/status/933910941959204865
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement