एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत म्हशीच्या दूधाची भाववाढ, एक एप्रिलपासून नवे दर लागू
मुंबईत येत्या एक एप्रिलपासून म्हशीच्या दूधाच्या दरात लिटरमागे किमान दोन रुपयांनी वाढ होणार आहे.
मुंबई : येत्या एक तारखेपासून म्हशीच्या सुट्या दूधाचे दर वाढणार आहेत. दूधाच्या दरात लिटरमागे किमान दोन रुपयांनी वाढ होणार आहे.
मुंबई-ठाण्यातील 1700 डेअरी मालकांच्या मुंबई दूध उत्पादक संघटनेने हा निर्णय घेतला. गुरुवारपासून होलसेल दर 64 रुपयांवरुन 66 रुपयांवर नेण्यात आले. यावर अतिरिक्त वाहतूक खर्च आकारला जाईल. त्यामुळे दूधाचे किरकोळ दर 70 ते 75 रुपयांवर पोहचले आहेत.
सध्या तरी वाढीव दराचा अमूल, गोकुळ, गोवर्धन यासारख्या कंपनींच्या पॅकेज्ड दूधावर परिणाम होणार नाही.
चारा, मजूर, वाहतूक यासारख्या बाबींवर खर्च वाढल्यामुळे पुढील सहामहीसाठी दूधाच्या दरात दोन रुपयांची वाढ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई दूध उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement