एक्स्प्लोर

बोरीवली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी, हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत येणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत आणण्यासाठी 826 कोटी रूपयांची तर नायगाव - जूईचंद्र बायपाससाठी 176 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही रेल्वे मंत्र्यांनी दिली.

मुंबई: नायगाव - जुईचंद्र असा नवा बायपास टाकून बोरीवली हे कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे भरलेल्या कोकणवासियांच्या मेळाव्यात दिली. याचवेळी हार्बर मार्ग बोरीवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

उत्तर मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पियूष गोयल (Piyush Goyal) या मेळाव्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बोरीवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे, गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेमार्ग बोरीवलीला जोडण्यात यावा तसेच वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु करण्यात यावी अशा तीन मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत आणण्यासाठी 826 कोटी रूपयांची तर नायगाव - जूईचंद्र बायपाससाठी 176 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही रेल्वे मंत्र्यांनी दिली.

उत्तर मुंबईतील कोकणवासीयांशी संवाद साधून रेल्वेबाबतच्या त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या मेळाव्याला उपस्थित राहिले होते. यावेळी 'कसे आसात, बरे आसात मा' असे मालवणी भाषेत कोकणवासियांना विचारताच कोकणवासीयांना आनंद झाला. 'आम्ही बरे आसू' म्हणत कोकणवासियांनी त्यांना प्रतिसाद दिला. या मेळाव्याला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सर्वश्री योगेश सागर, मनीषा चौधरी, सुनील राणे, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, विजय गिरकर उपस्थित होते.

आता बोरीवली हेच माझे पहिले घर- पियूष गोयल

बोरीवली हेच आता माझे पहिले घर आहे आणि माझ्या हातून काही चांगले घडावे यासाठी मी येथे आलो आहे, असे पियूष गोयल यांनी सांगितले.नमो यात्रेत नागरिकांकडून मिळालेले अपार प्रेम आणि आपुलकीबद्दल कसे वाटते असे विचारले असता पीयूष गोयल म्हणाले की, उत्तर मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. बोरीवलीने मला, माझ्या कुटुंबाला आणि आम्ही बोरीवलीकरांना आमच्या जीवनात सामावून घेतले आहे. उत्तर मुंबईतील प्रचारात मुंबईकरांनी दाखवलेल्या प्रेमाने आपण भारावून गेल्याचे सांगत त्यांनी  स्वत:कडे बोट दाखवले आणि म्हणाले की या मुंबईकरांकडून जो प्रेमाचा वर्षाव होत आहे ते सर्व मोदीजींसाठी आहे आणि ते थेट त्यांच्याकडे जात आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विचार करून केंद्र सरकार मत्स्य संपदा योजनेसह अनेक योजना राबवीत आहे. येत्या काळात अशा अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पियूष गोयल यांनी दिली. 

ही बातमी वाचा:

Piyush Goyal: भाजपच्या वॉशिंग मशीनविषयी प्रश्न विचारताच पियूष गोयलांना आठवला बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget