एक्स्प्लोर

मुंबईत कोणत्या रस्त्यावर वाहनं ताशी 80 किमी वेगाने धावतात? : हायकोर्ट

जर वेळेची बचत करण्यासाठी महामार्ग उभारला तर त्यार वेग मर्यादेचे बंधन का? असा सवालही मुख्य न्यायमूर्तींनी उपस्थित केला.

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील वेगमर्यादेचा प्रश्न सध्याच्या अवस्थेनेच सोडवला आहे, कारण या रस्त्यांवर ताशी 80 किमी वेगाने वाहनं धावूच शकत नाहीत, असा टोला स्पीड गर्व्हनरसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान पार पडलेल्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने लगावला. तसंच सरकारने प्रवास वेगवान करण्यासाठी देशभरात एक्सप्रेसवे उभारले, मग वेग मर्यादा 60-80 पर्यंत का घालण्यात आली?, जर वेळेची बचत करण्यासाठी महामार्ग उभारला तर त्यार वेग मर्यादेचे बंधन का? असा सवालही मुख्य न्यायमूर्तींनी उपस्थित केला. स्पीड गव्हर्नर एक असे यंत्र आहे, ज्याचा उपयोग वाहनातील इंजिनची गती मोजून गती नियंत्रित करण्यासाठी होतो. मुंबईतील वाहनांमध्ये बसवण्यात आलेल्या स्पीड गव्हर्नरच्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप करत, राहत सेफ कम्युनिटी आणि सुरक्षा फाऊंडेशन अशा दोन सेवाभावी संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर नुकतीच मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. मुंबईत स्कूल बसेसही स्पीड गव्हर्नरच्या तरतुदींचे पालन करत नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. मात्र याचिकाकर्त्यांच्या याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आलेले प्रश्न मुंबईने स्वतःच सोडवले आहेत. कारण मुंबईत असा कोणता रस्ता आहे जिथे वाहने 80 किमी पेक्षा जास्त वेगाने वाहू शकतात?, असा सवाल उपस्थित करत याचिकेवरील सुनावणी 14 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. महाराष्ट्र सरकारने मे 2017 मध्ये काळी आणि पिवळी टॅक्सी, मोबाईल अॅप आधारित टॅक्सी, टूरिस्ट टॅक्सी, छोट्या टेम्पो आणि पिक अप व्हॅनसारख्या तसंच 3500 किलोपेक्षा किमी वजनाच्या वाहनांवर वेग मर्यादा आणत प्रति तास 80 पर्यंत वेग मर्यादा नियंत्रक (स्पीड गव्हर्नर) बसवण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget