एक्स्प्लोर

कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळीची जन्मठेप हायकोर्टाकडून कायम

कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळी सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह इतर आरोपींना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (9 डिसेंबर) कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. 2 मार्च 2007 रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईतील असल्फा भागात हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. पोलीस तपासाअंती मारेकऱ्यांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या सांगण्यावरुनच ही हत्या केल्याचं सांगितलं होतं. अरुण गवळीने या हत्येसाठी यासाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्का अंतर्गत साल 2008 मध्ये अरुण गवळीला अटक केली होती. 2012 मध्ये मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला 14 लाख रुपयांचा दंड आकारत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर अन्य दहा आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. परंतु आजच्या सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळत जन्मठेप कायम ठेवली. काय होतं प्रकरण? कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती. प्रताप गोडसेला गवळीने या सुपारीची जबाबदारी दिली होती. याप्रकरणी आपलं नाव येऊ नये यासाठी नवे शूटर्स शोधण्यास सांगण्यात आलं होतं. गोडसेनंनंतर श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची यासाठी निवड केली. या दोघांना अडीच-अडीच लाख रुपये देण्याचं कबूल केलं आणि अॅडव्हान्स म्हणून 20-20 हजार रुपये दिले. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच जामसंडेकरच्या राहत्या घरी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळी सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. याआधी 23 एप्रिल रोजी त्याचा 28 दिवसांची फर्लो सुट्टी मंजूर झाली होती. त्यानंतर तो 9 मे रोजी तुरुंगाबाहेर आला होता. 7 जून रोजी त्याची फर्लो सुट्टी संपली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Embed widget