एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील रस्त्यांवर फक्त 414 खड्डे शिल्लक?
मुंबईतील अंधेरी, चकाला, जेव्हीएलआर या भागातील खड्डे लक्षात घेता केवळ एका वॉर्डमध्ये 414 खड्डे होत असताना संपूर्ण मुंबईत 414 खड्डे असल्याचा दावा कितपत खरा हा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.

मुंबई : मुंबईमध्ये आता केवळ 414 खड्डे शिल्लक असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. 10 जून ते 7 ऑगस्ट दरम्यान आलेल्या तक्रारींनुसार मुंबईत फक्त 414 खड्डे बुजवण्याचं काम शिल्लक असल्याचा दावा महापालिकेने केला. या दाव्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र 414 हा आकडा फक्त खड्डे बुजवण्याच्या तक्रारी निवारण करण्याचा आकडा असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर सद्यस्थितीत एकूण खड्डे किती आहेत? हा आकडा मुंबई महापालिकेकडे सुद्धा नाही.
मुंबई महापालिकेच्या या अहवालानुसार जून ते ऑगस्ट दरम्यान मुंबई महापालिकेच्या 'एमसीजीएम 24*7' या अॅपवर आणि बीएमसीच्या ट्विटरवर एकूण 2 हजार 634 खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 7 ऑगस्टपर्यंत 2 हजार 234 खड्ड्यांच्या तक्रारीचं निवारण हे मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण 84. 37 टक्के इतक्या खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण केल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
या अहवालाबाबत 'एबीपी माझा'च्या टीमने रिऍलिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या 'बी' वॉर्डमध्ये (पायधुनी, काळबादेवी परिसर) या अहवालानुसार फक्त 1 खड्डा बुजवण्याचं काम बाकी आहे. मात्र त्या ठिकाणी 8 ते 10 खड्डे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे महापालिकेचा हा अहवाल कितपत खरा आहे? हा प्रश्न आहे.
विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार, पावसाळा सुरु झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील खड्ड्यांची संख्या जवळपास 19 हजार इतकी समोर आणली होती. त्यापैकी बीएमसीने फक्त दोन ते अडीच हजार खड्डे बुजवण्याचं काम केलं असून अद्याप मुंबईतील 16 ते 17 हजार खड्डे बुजवण्याचं काम बाकी असल्याचं महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितलं आहे.
मुंबईतील अंधेरी, चकाला, जेव्हीएलआर या भागातील खड्डे लक्षात घेता केवळ एका वॉर्डमध्ये 414 खड्डे होत असताना संपूर्ण मुंबईत 414 खड्डे असल्याचा दावा कितपत खरा हा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
