BMC : मोठी बातमी : वायंगणकर म्हणाले शिवबंधन बांधून लढणार, ठाकरेंचा उमेदवार पाडणार, आता हरी शास्त्रींचं उत्तर, म्हणाले...
Hari Shastri vs Chandrashekhar Waingankar : आमची लढाई भाजप आणि शिंदेंसोबत आहे, वायंगणकरांसोबत नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हरी शास्त्री यांनी केलं.

मुंबई : गेल्या वेळी मी इच्छुक असताना चंद्रशेखर वायंगणकरांना (Chandrashekhar Waingankar) तिकिट देण्यात आलं, त्यावेळी नाराज न होता पक्षाचा आदेश म्हणून आम्ही त्यांना निवडून आणलं. आता वायंगणकरांनी नाराजी सोडावी आणि आपल्यामागे राहावं असं हरी शास्त्री (Hari Shastri) म्हणाले. आपली लढाई ही भाजप-शिंदे सेनेविरोधात आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हरी शास्त्री यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कट्टर शिवसैनिक असलेल्या चंद्रशेखर वायंगणकरांनी बंडखोरी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री'च्या दारात असलेल्या वांद्र्यातील प्रभाग क्रमांक 95 मध्ये दोन उमेदवार इच्छुक होते. माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांना डावलून श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर नाराज झालेल्या चंद्रशेखर वायंगणकर यांनी अपक्ष अर्ज भरला आणि हा अर्ज मागे घेणार नसल्याचंर त्यांनी सांगितलं.
BMC Election : वायंगणकरांनी पक्षादेश पाळावा, हरी शास्त्रींचे आवाहन
दुसरीकडे, हरीश शास्त्री यांनी वायंगणकरांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू असं म्हटलं. 2017 ला आम्ही वायंगणकरांना मदत केली, आता त्यांनी मला मदत करावी आणि पक्षादेश पाळावा. आमची लढाई भाजप आणि शिंदेंसोबत आहे, वायंगणकरांसोबत नाही अशी प्रतिक्रिया हरी शास्त्री यांनी दिली.
हरी शास्त्री म्हणाले की, "आमच्यासाठी पक्षादेश महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि तो सगळ्यांना मान्य झाला. 2017 साली मी इच्छुक होतो, त्यावेळी श्रीकांत सरमळकर चार तास मातोश्रीवर होते. त्यावेळी मला उमेदवारी डावलली गेली. पण उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला आणि त्यावेळी वायंगणकर यांचा मी प्रचार केला, त्यांना निवडूणही आणलं."
आम्ही लोकांचे प्रश्न सोजडतोय, मुंबईचा महापौर मराठी माणूसच बनला पाहिजे आणि मी सुद्धा मराठीच आहे. गेली 42 वर्षे झाले मी इथेच राहतो आणि मी मराठीच आहे असं हरी शास्त्री म्हणाले.
Hari Shastri vs Chandrashekhar Waingankar : आम्हीच लढाई जिंकणार
अनिल परब हे आमचे विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांची भेट घेतली शुभेच्छा दिल्या. ते पक्षाचे नुकसान करणार नाहीत असं हरी शास्त्री म्हणाले. आम्ही लढाई लढणार आणि जिंकणार. आमची लढाई ही शिंदे सेना आणि भाजप विरोधात आहे. ही फूट सुद्धा त्यांनी पाडली आहे. मराठी माणसात फूट पाडण्याचं काम ते करतात असा आरोप हरी शास्त्री यांनी केला.
Mumbai Election : वायंगणकरांची नाराजी दूर करणार
हरी शास्त्री म्हणाले की, "मी शंभर टक्के वायंगणकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. उद्धव ठाकरेंसाठी आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे, त्यासाठी एकत्र त्यांनी यावं. जर ते अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असतील तर पक्ष निर्णय पुढचा घेईल. ही लढाई शिवसेना विरुद्ध भाजप अशीच असेल, माझी वांगणकरांच्या विरोधात लढाई नाही."
ही बातमी वाचा:
























