BMC Election Wards: मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांच्या रचनेला मंजुरी, निवडणुकीच्या हालचालींना वेग
BMC Election Wards: मुंबईतील निवडणुकीच्या तयारीला आता वेग येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने बीएमसीच्या 227 वॉर्डांच्या रचनेला मंजुरी दिल्याने पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.

BMC Election Wards: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सध्या वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची (Local Bodies Election) प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना (BMC Wards) अंतिम करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे (BMC Election) सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभाग रचनेस (Prabhag Rachna) राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यानंतर 494 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. या सगळ्याचा विचार करून नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप प्रभाग रचना पाठवली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागाची प्रभाग रचना अंतिम करून त्याचा संपूर्ण आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 337 असून ही लोकसंख्या मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांमध्ये विभागली गेली आहे.
Mahanagarpalika Election: महानगरपालिका निवडणुका कोणत्या महिन्यात होणार?
मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुका कधी होणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. याबाबत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते. आता कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटतं. मी 40 वर्षे यामध्ये घालवली त्यामुळे मी अंदाज मांडला आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे, प्लॅटफार्मवर जो राहील तो राहील. मात्र, नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीबदेखील लागते, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.
आणखी वाचा
पिंपरी-चिंचवड प्रभाग रचना 'जैसे थे', हरकतींसाठी 14 दिवसांची मुदत, जाणून घ्या A टू Z माहिती
नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना अखेर जाहीर, 2017 चीच स्थिती 'जैसे थे', जाणून घ्या A टू Z माहिती
























