एक्स्प्लोर

Nashik Municipal Elections : नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना अखेर जाहीर, 2017 चीच स्थिती 'जैसे थे', जाणून घ्या A टू Z माहिती

Nashik Municipal Elections : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे.

Nashik Municipal Elections : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक महापालिकेची (Nashik NMC) प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (दि. 22) जाहीर करण्यात आली. मागील निवडणुकीप्रमाणे 2011 च्या लोकसंख्येचा आधार, 122 सदस्य संख्या, चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना 'जैसे थे' राहिली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार या प्रभागरचनेवर दि. 4 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा आणि माहिती महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. 

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शासनाच्या नगरविकास विभागाने 2022 मधील प्रभागरचनेचे आदेश कायम ठेवत, चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचे निर्देश महापालिकांना दिले होते. त्यावर नाशिक महापालिकेने 2017 च्या निवडणुकीप्रमाणे 122 सदस्यसंख्या असलेले चार सदस्यीय 29 व तीन सदस्यीय दोन अशा एकूण 31 प्रभागांची प्रारूप रचना तयार करून  दि. 5 ऑगस्टला राज्याच्या नगरविकास विभागाला सादर केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता.

प्रभागरचनेतील बदलावरून महायुतीत वादंग निर्माण झाले होते. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रभागरचना 'जैसे थे' राहिल्याने महायुतीतील वादावर आता पडदा पडला आहे. 

प्रभाग 15 व 19 तीन सदस्यीय

प्रभागरचना तयार करताना चार सदस्यीय प्रभाग पद्धत, तसेच प्रभागरचना उत्तरेपासून तयार करण्याचे नियम कायम असल्याने नाशिक महापालिकेतील मखमलाबाद परिसर यंदाही प्रभाग क्रमांक 1 ठरला आहे. चार सदस्यीय 29 प्रभाग अस्तित्वात आले असून, गत प्रभागरचनेनुसार यंदाही प्रभाग क्रमांक 15 व 19 हे दोन प्रभाग तीन सदस्यीय प्रभाग म्हणून अस्तित्वात आले आहेत.

48 हजार लोकसंख्येचे प्रभाग

प्रभागरचना करताना लोकसंख्येच्या प्रगणक गटांची जुळवणी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात आली असून यामध्ये सरासरी 48 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग अस्तित्वात आला आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकी राजवट लागली असून निवडणुका कधी होणार? याकडे राजकीय पदाधिकारी, कार्यकत्यांचे लक्ष लागले होते, अखेर शुक्रवारी महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्याने हालचालींना अधिक वेग येणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik News : मराठी लोगो की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो; नाशिकमध्ये परप्रांतीयाची मुजोरी, मनसैनिकांकडून चोप, VIDEO

Suhas Kande on Chhagan Bhujbal : भुजबळांचा नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा, कट्टर विरोधक सुहास कांदे म्हणाले; कुंभमेळ्याचा 'मलिदा' खाण्यासाठीच...

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget