एक्स्प्लोर

स्पेशल रिपोर्ट : इमारतींना संभाव्य धोक्यापासून वाचवणारं सॉफ्टवेअर धुळखात

मुंबईतील इमारतींचा संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेला एक सॉफ्टवेअर देण्यात आलं होतं. मात्र हे सॉफ्टवेअर लालफितीत अडकल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : मुंबईतलं कमला मिल आणि साकीनाक्यातल्या दुकानाला लागलेली आग या दोन्ही घटना टाळता आल्या असता. मुंबई महापालिकेला आपल्या कर्तव्याची थोडी जरी जाणीव असती तर या घटना घडल्याच नसत्या. मुंबईतील इमारतींचा संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेला एक सॉफ्टवेअर देण्यात आलं होतं. मात्र हे सॉफ्टवेअर लालफितीत अडकल्याचं समोर आलं आहे. मुंबईत महिनाभरात घडलेल्या दोन घटनांमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. या घटना टाळता आल्या असत्या का... तर याचं उत्तर कदाचित होय असं असतं... याचं कारण 3 वर्षांपूर्वी आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नेसरीकर यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीला सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यास सांगितलं होतं. सॉफ्टवेअरला महापालिका सहआयुक्त सीताराम कुंटे आणि महिषा म्हैसकर यांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवला होता. मात्र नेसरीकर यांच्या मृत्यूनंतर हे सॉफ्टवेअर अद्याप महापालिकेच्या नियम आणि परवानगीच्या फेऱ्यात जाळ्यात अडकलं आहे. या सॉफ्टवेअरमध्ये नेमकं काय आहे?
  • एखादी इमारत कशी आहे?
  • इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट कधी आणि कसं करावं? नव्या इमारतीमध्ये अग्निरोधक उपकरणं कशी बसवावी?
  • अग्निरोधक उपकरणाची मुदत कधी संपतेय?
  • अग्निरोधक यंत्रणेची तारीख संपली की सॉफ्टवेअर त्याची कल्पना देणारं हे सॉफ्टवेअर आहे.
सॉफ्टवेअरची गरज ओळखून त्यावेळच्या कमिटीने तात्काळ हिरवा कंदील दाखवला. मात्र आताच्या महापालिका अधिकाऱ्यांकडून या सॉफ्टवेअरला तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या डोळे झाकू वृत्तीवर आता अनेक स्तरातून सडकून टीका होत आहे. बेजबाबदार आणि निष्क्रिय कामांवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. कमला मिल दुर्घटनेनंतर महापालिका आक्रमक होऊन नियमबाह्य हॉटेल्सवर कारवाई करत आहे. निष्पाप लोकांचे जीव गेल्यावर मनपा जर वरातीमागून कारवाईचा बॅण्ड वाजवत असेल तर त्यांचा करावा तेवढा संताप कमीच आहे. संबंधित बातम्या - 1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!  कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं! कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक' कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...  कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली  मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू  मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Dominos Pizza Action : मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Embed widget